Tuesday, October 15, 2024
Home ताज्या कोल्हापूरच्या खासबाग मैदानात  नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील 'मातीतील कुस्ती स्पर्धां' होणार

कोल्हापूरच्या खासबाग मैदानात  नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील ‘मातीतील कुस्ती स्पर्धां’ होणार

कोल्हापूरच्या खासबाग मैदानात  नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील ‘मातीतील कुस्ती स्पर्धां’ होणार

कोल्हापूर/प्रतिनिधी : राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूरच्या खासबाग मैदानात यावर्षी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील ‘मातीतील कुस्ती स्पर्धां’चे आयोजन करण्यात येणार आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे व भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार श्री बृजभूषण शरण सिंह यांच्यामध्ये आज झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली.                                     काही दिवसांपूर्वी याच बाबतीत खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी बृजभूषण यांची भेट घेऊन राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी कुस्तीसाठी दिलेले योगदान याबद्दल त्यांना माहिती दिली होती व कुस्ती या क्रीडा प्रकारच्या उद्धारासाठी महाराजांनी जे उत्तुंग कार्य केले आहे, त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षात कोल्हापूरच्या खासबाग कुस्ती मैदानात राष्ट्रीय स्तरावरील मातीतील कुस्ती स्पर्धा भरवावी, अशी मागणी संभाजीराजे यांनी त्यांच्याकडे केलेली होती. त्यावेळीच त्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली होती.                                       आज दिल्ली येथे झालेल्या बैठकीत नोव्हेंबर महिन्यात आपण  खासबाग मैदान कोल्हापूर येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करू, अशी ग्वाही खासदार श्री बृजभूषण शरण सिंह यांनी संभाजीराजे यांना दिली. पुरुष व महिला अशा दोन्ही विभागांच्या या स्पर्धा असणार असून देशभरातील नामांकित असे ३०० हून अधिक मल्ल या स्पर्धेत सहभागी होतील, असे संभाजीराजे यांनी यावेळी सांगितले. याबाबत पुढील नियोजन करण्यासाठी संभाजीराजे यांच्या पुढाकारातून कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी व राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे सचिव यांची संयुक्त बैठक दिनांक २ मे रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments