देश एकसंध ठेवण्याचे आपल्या सर्वांसमोर आव्हान – खा. शरद पवार
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज हा देश एकसंध ठेवण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी मत व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर काढलेल्या परिसंवाद यात्रेच्या संकल्प सभेत ते बोलत होते.२०१४ च्या अगोदर देशाची स्थिती वेगळी होती. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील सरकार होते. देशासमोरील प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रितपणाने कष्ट घेतले गेले आणि अनेक क्षेत्रांमध्ये या देशाची उन्नती कशी होईल, याची खबरदारी घेतली गेली. २०१४ ची निवडणूक ही वेगळी झाली आणि भाजपाच्या हातात सत्ता आली. लोकांचा कौल होता आणि तो आम्ही स्वीकारला. परंतु आपण बघतो आहोत, सत्ता हातात आल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग सामान्य माणसात एकवाक्यता कशी राहील, हा देश एकसंध कसा राहील, लोकांचं दु:ख कमी कसं होईल, समाजातील सगळे घटक एका विचाराने कसे राहतील ही जबाबदारी कोणत्याही राष्ट्रीय नेतृत्वाच्या आणि सरकारच्या प्रमुखांची असते, पण आज चित्र वेगळं दिसतय. माणसा-माणसांमध्ये अंतर निर्माण झाले आहे. आपण बघितले, मागील काही दिवस देशाची राजधानी दिल्लीच्या काही भागात संघर्ष झाला, हल्ले झाले,जाळपोळ झाली. त्या ठिकाणी कुणाचं राज्य आहे? केजरीवाल यांच्या हातात दिल्लीची सत्ता असेल, पण दिल्लीचे गृहखाते त्यांच्या हातात नाही. दिल्लीचे गृहखातं हे भाजपाच्या हातात आहे, अमित शाह यांच्या हातात आहे आणि गृह खात्याची जबाबादरी ज्यांच्यावर आहे, त्यांनी ही देशाची राजधानी एका विचाराने एकसंध राहील, याची खबरदारी घ्यायला हवी होती, पण ते घेऊ शकले नाहीत.
आज कर्नाटकातील समाजातील अल्पसंख्याक लोकांच्याबद्दल त्या ठिकाणी जाहीर बोर्ड लावले, की या गावात या ठिकाणी या अल्पसंख्याकाचं दुकान आहे, त्या दुकानात कुणीही खरेदी करू नये. या ठिकाणी अल्पसंख्याकाचं रेस्टॉरंट आहे तिथे कुणी जाऊ नये. काय समजाव? आणि हा संदेश देणारे लोक सत्ताधारी पक्षाचे आहेत. हे चित्र शेजारच्या राज्याचं आहे. दिल्ली असेल, शेजारचं राज्य असेल, जिथं जिथं भाजपाच्या हातात सत्ता आहे, त्या ठिकाणची हीच अवस्था आहे. त्यामुळे एकप्रकारच्या आव्हानाची अवस्था आज आपल्या सर्वांच्या समोर आहे.” असं शरद पवारांनी यावेली सांगितलं.
शिवाजी महाराजांचे नाव तुमच्या आमच्या अंतःकरणात आहे मात्र आज ईडी आणि इन्कमटेक्स विभागाचा वापर केंद्र सरकार करत आहे. सन्मानाने काम करणाऱ्यांवर दबाव आणला जात आहे.उत्तरच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर ने चांगला संदेश महाराष्ट्र दिला आहे.आधी जगभरातले नेते भारत दर्शन करायचे आता चित्र बदलले आहे.जगभरातील नेत्याचा वावर आता गुजरातमध्येच वाढलाआहे. संकुचित विचार देशाच्या हिताचा नाही सत्ता डोक्यात जाऊ देऊ नये कोल्हापुरात राष्ट्रवादी संकल्प सभेत खा.शरद पवार बोलत होते. महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांचा इतिहास मांडला आहे शाहू महाराजांसारखा राजा या कोल्हापूर नगरीमध्ये होऊन गेला दिल्लीतील गृहखाते भाजपच्या हातात आहे. दिल्लीत जे घडते तेच जगापर्यंत पोहोचते. भाजपच्या सत्तेत अल्पसंख्यांकांवर अन्याय होत आहे. सीबीआय इडीचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत आहे. कितीही संकटे आली तरी आम्ही लढत राहणार असे सांगितले. चंद्रकांत पाटलांना हिमालयात पाठवण्याचा बंदोबस्त कोल्हापूरकरांनी केला आहे.
एकसंघ ठेवण्याचं आपल्यासमोर मोठे आव्हान आहे.ते पेलायचे आहे.
काश्मीर फाइल्स मधून संघर्ष वाढविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
त्यामुळे देश एकसंघ ठेवायचा असेल तर आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि ते अपल्यासमोरील आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले.
संकल्प यात्रेदरम्यान महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये फिरलो जवळजवळ तीन लाख कार्यकर्त्यांची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची संवादांमध्ये चर्चा केली आहे राष्ट्रवादी पक्षाची मोट बांधण्यासाठी मी प्रयत्न केला आहे असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. परिस्थिती बदलत चालली असून जातीयवादी शक्तींना बाजूला ठेवणे आवश्यक आहे. पाकिस्तान साठी परिस्थिती निर्माण करून देशाचे राजकारण बदलू पहात आहेत यासाठी एकीची वज्रमूठ एकत्रित बांधणे आवश्यक असल्याचे सांगितले. निर्धार पुरोगामी महाराष्ट्राचा ही टॅगलाईन घेऊन ही संकल्प यात्रा सुरू केल्याचे पाटील यांनी यावेळी नमूद केले देशात पवार हेच सर्वात महान नेते आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेले तरी त्यांचे नाव आदराने घेतले जात असल्याचे सांगितले. मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या सर्वच ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. यापुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये पाडण्यासाठी साठी नाही तर निवडून आणण्यासाठी उमेदवार उभे केले पाहिजेत असेही सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांनी चालवलेला पक्ष आहे जातींमध्ये तेढ निर्माण केले जात आहेत वेगळ्या गोष्टींवर लोकांची मध्ये बदलण्याचा प्रयत्न भाजपकडून चालू आहे आणि यामध्ये लोकांना अडकवून पेट्रोल डिझेलचे व गॅस चे भाव वाढविले जात आहेत बेरोजगारी वाढत चाललेली आहे महागाई वाढत चाललेले आहे यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार असून विकासाचा अजेंडा निर्माण करण्याचे धाडस दाखविले पाहिजे.तारतम्य ठेवून आपण सर्वांनी बोलणे आवश्यक आहे असे महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमधील संकल्प यात्रेमध्ये बोलून दाखविले. नवीन वर्षाची सुरूवात चांगली होत असताना जात धर्म व द्वेषाचे राजकारण करण्याचे काम चालू झालेले आहे कोरोना चे संकट आहे आर्थिक चक्र बिघडलेले आहेत नोकऱ्या कामधंदे गेलेली आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत आहे खूप गोष्टी करायच्या आहेत जाती-धर्मांमध्ये अंतर पाडण्याचे काम सुरू आहे.याला बळी न पडता आपण कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नये गेली ५० वर्षे महाराष्ट्र मध्ये मा शरद पवार हे काम करत आहेत असे सांगितले
यावेळी तपोवन मैदान येथे झालेल्या सभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.