Friday, December 13, 2024
Home ताज्या हिरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरला आयोजित होणार- पालकमंत्री सतेज...

हिरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरला आयोजित होणार- पालकमंत्री सतेज पाटील

हिरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापूरला आयोजित होणार- पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित होणारी हीरक महोत्सवी वर्षातील महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी यावर्षी कोल्हापूर येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित होणार असून हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख व सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर वासीयांच्या वतीने आभार मानले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दिनांक ६ मे रोजी १०० व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने व स्मृती शताब्दी वर्षानिमित्ताचे औचित्य साधून कोल्हापूर येथे या स्पर्धा घ्याव्यात अशी मागणी कोल्हापूरकरांनी केली होती. या संदर्भामध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.
संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या स्मृतींना नुकतीच १०० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य व राजर्षी शाहू महाराज यांची स्मृतिशताब्दी वर्ष या निमित्ताने कोल्हापूर मधील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे दिनांक ६ मे २०२२ पासून हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात येणार आहे.यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या राज्य नाट्य स्पर्धेच्या १९ केंद्रांवरील प्राथमिक फेरीत ३५६ नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला होता. यापैकी प्राथमिक फेरीतील ३४ नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलेली आहे. वेगवेगळ्या विषयांची निवडक उत्तम प्रतीची ३४ नाटके अनुभवायची पर्वणी कोल्हापुरातील नाट्य रसिक व कलावंतांना यानिमित्ताने मिळणार आहे. हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झालेल्या संस्था, कलाकार व तंत्रज्ञ यांना प्रयोग सादरीकरणासाठी शुभेच्छा सतेज पाटील यांनी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन

आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने सौंदत्ती डोंगरावर मोफत आरोग्य शिबीरासह अल्पोपहार वाटपाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. सौंदत्ती...

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर

कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री कपिलेश्वर मंदिरा भोवतीचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावे – भाजपाच्या वतीने उपायुक्त श्रीमती साधना पाटील यांना निवेदन सादर कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे ग्रामदैवत श्री...

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हलमध्ये घोडावत स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश   अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांनी आय आय टी गुवाहाटी येथे आयोजित 'इंडिया इंटरनॅशनल सायन्स...

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

प्रभु श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी इल्तिजा मुफ्तींवर कायदेशीर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती   कोल्हापूर/प्रतिनिधी : मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारच्या कार्यकाळात काश्मीरमध्ये हिंदूंवर जो अत्याचार...

Recent Comments