Thursday, July 18, 2024
Home ताज्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार हेमंत टकले यांनी तपोवन...

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार हेमंत टकले यांनी तपोवन वरील जय्यत तयारीची केली पाहणी

शरद पवार शनिवारी कोल्हापुरातील संकल्प सभेत देणार करारा जवाब

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार हेमंत टकले यांनी तपोवन वरील जय्यत तयारीची केली पाहणी

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरात शनिवारी दि. २३ एप्रिल २०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची जाहीर संकल्प सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर काढलेल्या परिवार संवाद यात्रेची सांगता येथील तपोवन मैदानावर सायंकाळी पाच वाजता या संकल्प सभेने होणार आहे. या सभेच्या माध्यमातून शरद पवार कोल्हापुरातून विरोधकांना करारा जवाब देणार आहेत. या सभेला राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळींसह मंत्री, खासदार, आमदार व कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत.
सभेच्या तयारीचा आढावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पवार, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास, विनायक फाळके, उत्तम कोराने आदी प्रमुखांनी घेतला आहे.

“एक लाखाहून अधिक उपस्थिती……..”

या सभेला जिल्हाभरातून एक लाखाहून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल, अशी माहिती निमंत्रक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यामध्ये महिलांची उपस्थिती ही मोठ्या संख्येने असणार आहे. कोल्हापुरातील ही सभा गर्दीचा विक्रम नोंदवेल, असेही ते म्हणाले.
तपोवन मैदानावर होणाऱ्या राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या सांगता सोहळ्याची तयारी जय्यत सुरू आहे. या तयारीचा आढावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पवार, यांच्यासह प्रमुखांनी घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments