कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या सचिवपदी प्रीतम ओसवाल, तेजस धडाम यांची निवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची आज बैठक होऊन सचिवपदी प्रीतम ओसवाल व तेजस धडाम यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
सचिवपद निवडीसाठी नूतन अध्यक्ष राजेश राठोड व उपाध्यक्ष विजय हावळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये प्रीतम ओसवाल व तेजस धडाम यांची निवड करण्यात आली. यावेळी संचालक कुलदीप गायकवाड, किरण गांधी, ललित ओसवाल, कुमार ओसवाल, अशोककुमार ओसवाल, विजयकुमार भोसले, संजय रांगोळे, भैरू ओसवाल, सिद्धार्थ परमार, शीतल पोतदार आणि शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.