Thursday, December 5, 2024
Home ताज्या उद्योग क्षेत्राच्या समस्या शासन स्तरावर सोडविण्याचे नूतन आमदार जयश्री जाधव यांचे आश्वासन

उद्योग क्षेत्राच्या समस्या शासन स्तरावर सोडविण्याचे नूतन आमदार जयश्री जाधव यांचे आश्वासन

उद्योग क्षेत्राच्या समस्या शासन स्तरावर सोडविण्याचे नूतन आमदार जयश्री जाधव यांचे आश्वासन

समाजातील उपेक्षित घटकांना उद्योग विश्वाने सामावून घ्यावे – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

मेक इन इंडिया धर्तीवरील व्हायब्रंट महाएक्स्पो २०२२ प्रदर्शनाची अभूतपूर्व सांगता

कोल्हापूर/प्रतिनिधी : उद्योग क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण व्हावी उद्योग क्षेत्राची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी अशा प्रदर्शनाचे प्रत्येक वर्षी आयोजन करणे गरजेचे आहे. उद्योजकांच्या समस्या आणि त्या सोडवण्यासाठी अण्णांची सर्व सुरू असलेली धडपड मी जवळून पाहिली आहे. उद्योगसाठीच्या ज्या समस्या आहेत व जागेची समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत.हे प्रश्न आणि अशा विविध समस्या या शासनापर्यंत पोहोचवणे व त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे असे नूतन आमदार श्रीमती जयश्री जाधव यांनी आश्वासन दिले.व्हायब्रन्ट महाएक्स्पो २०२२ प्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या.
नवनवीन संकल्पना नागरिकांना माहिती करून देण्याचा हा प्रदर्शन महत्वपूर्ण उपक्रम उद्योगधंदे कोल्हापूर साठी नवीन नाहीत शाहू महाराज यांचा उद्योगासाठी आग्रह असायचा उदयोगासाठी शाहू महाराजांनी नेहमी मदत केली त्याचाच परिणाम म्हणून आपल्या भागात उदयोगाचं जाळं उभारले आहे.नवनवीन तंत्रज्ञा्नांची जोड देण, नॉलेज बेसड इंडस्ट्रीज हि संकल्पना आता महत्वाची आहे.या नवनवीन संकल्पना राबवत असताना सामाजिक जाणीव असणे गरजेचे आहे.
जिल्ह्यात उपक्रम हाती घेणे गरजेचे आहेत. तृतीय पंथी आणि वेश्या व्यवसाय या दोन गटाकडे आपण लक्ष देण गरजेचे आहे. हे दोन घटक सर्वात जास्त उपेक्षित घटक आहेत.या घटकांसाठी पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून त्यांचं सक्ष्मीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत आपण उद्योजक या नात्याने या वर्गातील किमान एक व्यक्तीची निवड करावी आपल्याकडील कामासाठी करावी असे अवाहन जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार यांनी केले.
या उपेक्षित वर्गाला त्यांच्या चक्रव्यहातून बाहेर काढण्यासाठी त्यांना मदत करायची आहे या वर्गसमोर असणारा अंधार दूर करावा असे आवाहन केले.यातून हि औद्योगिक बाजारपेठ आपण आणखी पुढे घेऊन जाल असेही सांगितले.
प्रयोजक रिलायन्स पॉलिमर सत्यजित भोसले प्रयोजक सदाशिव बर्गे, प्रयोजक संजय नेहरे,यांचा व विशेष सत्कार – ओंकार दळवी, विजय पाटील -व्याख्याते यांचा करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर शिवाजी पोवार,यम आय डी.सी रिजनल ऑफिसर राहुल भिंगारे,जयेश ओसवाल महाराष्ट्र चेंबरचे सागर नांगरे उपस्थित होते.                             यावेळी आपल्या प्रास्ताविक व स्वागत पर भाषणात महाराष्ट्र चेंबर युवा शाखा चेअरमन संदीप भंडारी यांनी महाराष्ट्र चेंबर विषयी व प्रदर्शनाविषयी माहिती सांगितली.सूत्रसंचालन ताज मुलाणी यानी केले तर आभार जयेश ओसवाल यांनी मानले. कोरोनाच्या कालावधीमध्ये बाजारामध्ये आर्थिक मंदीची स्थिती असतानाही कोल्हापूर मध्ये आयोजित व्हायब्रंट महाएक्स्पो २०२२ या प्रदर्शनास उद्योजकांसह, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व गर्दी चार दिवस केली होती. आजच्या शेवटच्या दिवशीही उद्योजकांनी व महाविद्यालयीन इंजिनियर विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी शाहूपुरी जिमखाना मैदान येथे गर्दी केली होती. मेक इन इंडियाच्या धर्तीवर मेक इन कोल्हापूर हे व्हायब्रंट महाएक्स्पो २०२२ हे भव्य आणि आधुनिक पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक आणि मशिनरी यांचे प्रदर्शन १५ ते १८ एप्रिल या कालावधीत कोल्हापूर मध्ये आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा आज समारोप कोल्हापूरचे जिल्हाधिकारी श्री राहुल रेखावार,नूतन आमदार श्रीमती जयश्री जाधव,एमआयडीसीचे रिजनल ऑफिसर राहुल भिंगारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. समारोपानंतर स्टॉलधारक कंपन्यांना स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर ही उद्योग नगरी म्हणून ओळखली जाते.नवनवीन उद्योग धंदे यांची माहिती व त्यांच्या उत्पादनांची माहिती व्हावी यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.जवळजवळ १०० देश विदेशातील कंपनी यांचे स्टॉल मांडण्यात आले होते. चार दिवसात १२ कोटींच्या आसपास उलाढाल ही झालेली आहे.जवळजवळ ५० हजार जणांनी या प्रदर्शनास भेट ही दिलेली आहे.प्रदर्शनाच्या माध्यमातून कोल्हापूरची नवी ओळख झाली असून बाहेरून आलेल्या कंपनीच्या स्टॉलधारकांना प्रदर्शनाच्या माध्यमातून ऑर्डरीही मिळाल्या आहेत व कोल्हापूर मधील उद्योगधंद्यांची ही माहिती बाहेरून आलेल्या उद्योजकांना मिळाली आहे व कोल्हापूर मधील उद्योजकांनाही बाहेरील कंपन्यांची माहिती मिळाली आहे. प्रदर्शनाला पश्चिम महाराष्ट्रातुन, उत्तर कर्नाटक,गोवा आणि कोकण या ठिकाणच्या उद्योजकांनी भेट दिली.व कंपनीच्या उत्पादनाची माहिती घेतली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांनी ही प्रदर्शन दुपारच्या वेळेस पाहण्यासाठी खुले करण्यात आले होते. समारोपावेळी कंपन्यांसोबत अनेक मान्यवरांनी चर्चाही केल्या. त्यांच्या भेटी घेतल्या रात्री नऊ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी पाहण्यासाठी खुले होते.
प्रदर्शनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी डिजिटल मार्केटिंगचा उद्योगाकरिता कसा उपयोग होणार आहे या विषयावर व्हिजिमी डिजिटल टेक्नॉलॉजी अँन्ड प्रा.लि. चे पार्टनर विजय पाटील व ओमकार दळवी यांनी मार्गदर्शन केले.यामध्ये त्यांनी मार्गदर्शन करताना डिजिटल मार्केटिंग ही काळाची गरज असून त्याला कोणत्याही भौगोलिक मर्यादा नाहीत हा कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस तुमच्या ऑफिसमध्ये बसून करू शकता. दरम्यान डिजिटल मीडियाचे महत्त्व लोकांना समजले आहे.कोरोनाच्या काळात ही याचा उपयोग झाला आणि आताही यापुढील काळातही याचा उपयोग हा सर्वांना करावा लागणार आहे. तुम्हीच कसं करू शकता आता पुढे पण होऊ शकतो.जगात कोठेही उद्योजक आपले उत्पादन हे या डिजिटलच्या माध्यमातून चेन्नई,महाराष्ट्र व कॅनडा येथेही विकू शकणार आहे.अशी माहिती दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स बिझनेस सोल्युशन पॉलिक्लिनिक प्रोग्राम वर मनीष पाटील यांनी आपले विचार मांडले यामध्ये त्यांनी बोलताना उद्योगाच्या मदतीसाठी व त्यांच्या समस्यांचे समाधान करण्यासाठी बिझनेस सोल्युशन पॉलिक्लिनिक प्रोग्राम हा महाराष्ट्र चेंबर तर्फे राबविण्यात येत आहे. यामध्ये उद्योगांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी चा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला जातो. या समस्या कन्सल्टंट अकॅडमिक इन्स्टिट्यूट आणि विद्यार्थी यांना उपलब्ध होतात. उद्योगाला याचा फायदा असा होतो की त्यांच्या एका समस्येवर समाधान देणारे अनेक पर्याय उपलब्ध होतात. त्यांच्या प्रायॉरिटी प्रमाणे आणि त्याच्या वेळेच्या मर्यादेप्रमाणे उद्योगसाठी योग्य तो पर्याय निवडू शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या समस्येवर काम करता आल्यामुळे शिक्षण घेत असतानाच उद्योगाचा अनुभव त्यांच्याकडे जमा होतो. शैक्षणिक संस्थांना उद्योगाच्या अडचणी समजल्यामुळे त्याप्रमाणे संशोधन करून उद्योगाच्या मदतीचे संशोधन विद्यार्थी व शिक्षक यांच्यामार्फत करण्यास मदत होऊ शकते. या उपक्रमाअंतर्गत इंनक्युबेशन सेंटर व इन्वेस्टर यांनासुद्धा जोडले जाते. उद्योग व शिक्षण संस्था यांच्यामधील दुवा सांगण्याचा हा सक्षम प्रकल्प आहे. या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीस हजार विद्यार्थ्यांना या उपक्रमाअंतर्गत इंडस्ट्री कनेक्ट या प्रोग्राम मार्फत प्रशिक्षित करण्यात येत आहे.एकूण १ लाख उद्योक ५ हजार कॅन्सल्टंट व ५०० शिक्षण संस्था जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत आहे.
कोल्हापूर जिल्हा उद्योग केंद्राचे प्रमुख सतीश शेळके यांनी शासनाच्या उद्योगसंदर्भाने असणाऱ्या योजना यामध्ये वैयक्तिक आणि सामूहिक लाभाच्या, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, सामूहिक प्रोत्साहन योजना, पायाभूत सुविधा योजना, समूह विकास योजना हाती संदर्भाने प्रस्थान याबाबत मार्गदर्शन केले. या प्रदर्शनासाठी शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर एमआयडीसी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फौंड्रीमॅन असोसिएशन,कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशन, मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल अँड हातकलंगले, डेस्टिनेशन कोल्हापूर यांचे सहकार्य मिळाले.तर प्रदर्शनाचे गोल्ड स्पॉन्सर हे रिलायन्स पॉलिमर्स व रामसा क्रेन्स प्रा.लि. हे होते. या प्रदर्शनाचे व्यवस्थापन हे क्रिएटिव्हज एक्झिबिशन अँन्ड इव्हेट व हाऊस ऑफ इव्हेंट या संस्थेचे सुजित चव्हाण यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments