Sunday, January 19, 2025
Home ताज्या २०२६ सालापर्यंत कोल्हापूर हे पुण्यानंतर राज्यातील सर्वात मोठे विकसित शहर असेल पालकमंत्री...

२०२६ सालापर्यंत कोल्हापूर हे पुण्यानंतर राज्यातील सर्वात मोठे विकसित शहर असेल पालकमंत्री सतेज पाटील यांचा विश्वास

२०२६ सालापर्यंत कोल्हापूर हे पुण्यानंतर राज्यातील सर्वात मोठे विकसित शहर असेल पालकमंत्री सतेज पाटील यांचा विश्वास

“व्हायब्रंट महाएक्सपो २०२२”प्रदर्शनाचे  उदघाटन चार दिवस चालणार प्रदर्शन

कोल्हापूर/प्रतिनिधी : २०२६ सालापर्यंत कोल्हापूर हे पुण्यानंतर राज्यातील सर्वात मोठे विकसित शहर असेल असा विश्वास महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला व्हायब्रंट महा एक्सपो २०२२ च्या शाहूपुरी जिमखाना मैदानावर झालेल्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.उद्योग क्षेत्राला चालना मिळावी व वेगवेगळ्या उद्योगांची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्री अँन्ड अँग्रीकल्चर व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्रीज व एमआयडीसी महाराष्ट्र राज्य  यांच्या संयुक्त विद्यमानाने हे भव्य औद्योगिक आणि यंत्रसामग्री असणारे  ” व्हायब्रंट महाएक्सपो २०२२” प्रदर्शन १५ ते १८ एप्रिल या कालावधीत शाहूपुरी जिमखाना मैदान येथे आयोजित केले आहे.या प्रदर्शनाचे आज फित कापून उदघाटन पालकमंत्री सतेज पाटील व खा.संजय मंडलिक व खा.धैर्यशील माने यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर खा.धैर्यशील माने,खा.संजय मंडलिक यांची तर
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे,एम. आय.डी.सीचे विभागीय अधिकारी राहुल भिंगारे,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे,करुणाकर शेट्टी,महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर,रिलायन्स इंडस्ट्रीज लि. पुणेचे सत्यजित भोसले, रामसा क्रेन्स प्रा. लि. चे सीईओ सदाशिव बरगे, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष रवी बोराटकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले अर्थकारणाची चक्रे फिरत आहेत नव्या टेक्नॉलॉजी माहिती होण्यासाठी नवीन उद्योजकांना हे प्रदर्शन माध्यम आहे कोल्हापूर मध्ये पूर्वी एमआयडीसी ची संकल्पना नव्हती उद्यम को – ऑप सोसायटी होती याठिकाणी उद्योजकांना उभे केले गेले आता मात्र उद्योग धंदे वाढीला लागले आहेत जमिनीची कमतरता आहे अशी २७० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. करवीर तालुक्यातील हलसवडे येथे एमआयडीसी करण्याचा विचार चालू आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये औद्योगिक प्रगती होणे आवश्यक आहे केवळ शेती आणि दूध यावरच अर्थकारण चालते त्यामुळे उद्योग क्षेत्राला चालना देणे गरजेचे आहे असे सांगितले. कोल्हापूरला पुढे घेऊन जाण्याचा विचार चालू आहे त्यासाठी अनेक रस्त्यांचा प्लान तयार केलेला आहे नाईट लँडिंग विमानतळावर करण्याची तयारी चालू आहे कोल्हापूर मधील किचन वेअर कपड्यांचे मार्केट यांच्या विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे मेट्रोच्या माध्यमातून पुणे मुंबई पुढे येत आहे यामुळे पश्चिम महाराष्ट्राला मूलभूत सुविधा कशा देता येतील यासाठी प्रयत्न चालू आहेत कोल्हापूरच्या विमान तळाच्या ठिकाणी सांगली सातारा वरून लोकांना येण्याची संधी आहे या ठिकाणी वैयक्तिक विमानतळ होऊ शकत नाही त्या दृष्टीने ही प्रयत्न चर्चा चालू आहेत देशात व राज्यात ३० जिल्हे एक्सपोर्ट मध्ये समाविष्ट आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश सातव्या क्रमांकावर आहे कनेक्टिविटी साठी प्रयत्न केला गेला पाहिजे निधी कशा पद्धतीने कोल्हापूरकडे येता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे सांगून २०२६ सालापर्यंत कोल्हापूर कोकणसाठी व पश्चिम महाराष्ट्रसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे अनेक रस्ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत सातारा कोल्हापूर रस्ता काम होणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे त्याला लवकरच गडकरी यांच्यांकडून मंजुरी मिळेल असे सांगितले.त्यामुळे कोल्हापूर विकासाच्या बाबतीत नावारूपाला येईल त्यासाठी आपल्या सर्वांची तयारी असली पाहिजे चंद्रकांत जाधव यांनी यासाठी डीपीआर तयार केला होता त्यामुळेच विकासाच्या दृष्टीने कोल्हापूरला पुढे घेऊन जायचे असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन चर्चा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अनेक हॉस्पिटल चे ठिकाणी बाहेरून रुग्ण येत आहेत त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय करण्याच्या दृष्टीने ही पावले टाकली जात आहेत डेस्टिनेशन कोल्हापूरच्या माध्यमातून प्रयत्न केला पाहिजे खेळाबाबत विचार केला पाहिजे आपल्या कोल्हापूर शहर बाबत कोणीही वाईट न बोलता सर्वांनी चांगले शहर असेच बोलावे.विकासासाठी सर्वांनी एकत्र बसून महिन्यातून एकदा बसून चर्चा करूया अशी अपेक्षा व्यक्त केली. तिसरी पिढी आपल्याला सांभाळावी लागणार आहे. कोल्हापूरमध्ये बदल करणे आवश्यक आहे अन्यथा पेन्शनरांचे शहर म्हणून कोल्हापूरची ओळख होईल.असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी औद्योगिक गती वाढविण्‍यासाठी हे प्रदर्शन भरविले गेले आहे वेळेची वाट न पाहता दिशा देण्याच्या दृष्टीने कोल्हापूरमध्ये पावले टाकने आवश्यक आहे.शाहू महाराजांनी राधानगरीच्या धरणाच्या माध्यमातून पिण्यास पाणी उपलब्ध केले तशी उद्योगांमध्ये दूरदृष्टी कशी आणायची हे आपण यातून शिकले पाहिजे. सरकारचे सहकार्य असल्याशिवाय कोणत्याही गोष्टी साध्य होत नाहीत त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.
यावेळी बोलताना खासदार संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांनी उद्योगधंदा यास प्राधान्य दिले केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही आमच्या खासदारकीच्या माध्यमातून अनेकदा प्रश्न मांडले आहेत व्यापारी व उद्योजकांचे प्रश्न सोडवावे यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो ललित गांधीजी त्या दृष्टीने प्रयत्नशील असतात एक लोकप्रतिनिधी म्हणून २०२४ पर्यंत या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी स्वागत पर भाषणात बोलताना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्री अँन्ड अँग्रीकलचरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक प्रदर्शन असून पन्नास हजाराच्या आसपास लोक या प्रदर्शनाला भेट देत असतात या प्रदर्शनाची माहिती घेऊन विकासाला चालना मिळू शकते.कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यानी बोलताना उदयोग क्षेत्राला चालना व गती मिळावी यासाठी स्वर्गीय उद्योजक चंद्रकांत जाधव यांनी प्रदर्शनासाठी पुढाकार घेतला होता उद्योजकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे हाच या प्रदर्शनाचा उद्देश आहे असे सांगितले.
रिलायन्स इंडस्ट्रीज लि. पुणेचे
सत्यजित भोसले यांनी पुण्यात अँटोपल्सचा कायमचा एक हॉल आहे तशा पद्धतीने एक कायमचा हॉल कोल्हापूरसाठी केला गेला पाहिजे.
महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलचे अध्यक्ष रवी बोराडकर यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून उद्योजकांना आपले उत्पादन समोर आणण्याची संधी मिळते.उद्योजकांच्या समस्या व अडचणी असा एक अभ्यास करायला आम्ही तयार असल्याचे सांगितले.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर यांनी औद्योगिक विकास हा कमी पडत आहे.सिंधुदुर्ग पाठोपाठ कोल्हापूरला पर्यटनमध्ये पुढे आणण्याचा विचार चालू आहे.
यावेळी हाऊस ऑफ इव्हेंटचे सुजित चव्हाण यांना लातूर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाची इव्हेंटची जबाबदारी मिळाल्याने त्यांचा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सुत्रसंचालन ताज मुलाणी यांनी केले तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे करुणाकर शेट्टी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी

कंदमुळे आणि औषधी वनस्पतींचे भव्य प्रदर्शन १८ आणि १९ जानेवारी २०२५ रोजी १०० हून अधिक कंदमुळे आणि १५० हून अधिक औषधी वनस्पती होणार प्रदर्शित   कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिप्लोमा अभियांत्रिकी, शॉर्ट-टर्म विभाग, आयटीआय सर्व शाखांच्या क्रीडा स्पर्धा २०२४-२५ इन्स्टिट्यूटचे...

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स” या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन

ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या CBSE प्रशिक्षण कार्यक्रमाचे संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजन   कोल्हापूर/प्रतिनिधी : संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथे "ट्रेनिंग फॉर ट्रेनर्स" या सीबीएसई...

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! – मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती

सीमा लढ्याच्या खटल्यात महाराष्ट्र सरकारने अनास्था दूर करून मराठी भाषिकांना न्याय द्यावा ! - मनोहर किणेकर, महाराष्ट्र एकीकरण समिती कोल्हापूर, १७ जानेवारी (वार्ता.) - महाराष्ट्र...

Recent Comments