Tuesday, July 23, 2024
Home ताज्या कोल्हापूरच्या खेळाडू डॉ. अथर्व गोंधळीचा ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये एक अनोखा नवा विश्वविक्रम

कोल्हापूरच्या खेळाडू डॉ. अथर्व गोंधळीचा ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये एक अनोखा नवा विश्वविक्रम

कोल्हापूरच्या खेळाडू डॉ. अथर्व गोंधळीचा ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये एक अनोखा नवा विश्वविक्रम

कोल्हापूर/प्रतिनिधी : नरके पन्हाळा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोल्हापूर चा खेळाडू डॉक्टर अथर्व गोंधळी याचा ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये एक अनोखा नवा विश्वविक्रम स्विमिंग १.९ किलोमीटर सायकलिंग ९० किलोमीटर आणि रनिंग २१ किलोमीटर सलग नऊ तास असणाऱ्या ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये डॉक्टर अथर्व संदीप गोंधळी यांनी ६ तास ३४ मिनिटे ५१ सेकंदात स्पर्धा पूर्ण करून जगातील सर्वात लहान वयात आणि कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करणारे पहिले भारतीय खेळाडू ठरला आहे. अथर्वने ट्रायथलॉन मध्ये नवा विश्वविक्रम नोंदविला आहे या त्याच्या विश्वविक्रमाची नोंद हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यापूर्वी असा विक्रम कोणाच्याही नावावर नसल्याचे हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सीईओ सुमन पल्ले यांनी सांगितले आहे.
डेक्कन स्पोर्ट्स क्लब कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित बर्गमन
११३ ट्रायथलॉन स्पर्धेत ९०० खेळाडूंचा सहभाग होता ३० जानेवारी २०२२ रोजी ही स्पर्धा राजाराम तलाव शिवाजी युनिव्हर्सिटी या एरिया मध्ये झाली या स्पर्धेत १.९ किलोमीटर स्विमिंग राजाराम तलावामध्ये करून कोल्हापूर ते तवंदी घाट परत कोल्हापूरच्या ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१ किलोमीटर रनिंग शिवाजी युनिव्हर्सिटी एरियामध्ये करून ६ तास ३४ मिनिट ५१ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण केली खूप कमी वेळेत आणि कमी वयात ही स्पर्धा पूर्ण केल्यामुळे डॉक्टर अथर्व याला यंगेस्ट बर्गमॅन होण्याचा बहुमान मिळाला होता. त्यावेळी त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले गेले होते.
यापूर्वी अथर्वने बारा तासात २९६ किलोमीटर सलग सायकलिंग करून सहा विश्वविक्रम ३० नोव्हेंबर २०१९ रोजी स्वतःच्या नावावर नोंदविले आहेत तसेच अथर्व तायक्वांदो मध्ये ब्लॅक बेल्ट ११ व्या वर्षीच झाला आहे.आतापर्यंत दहा विश्वविक्रमाची नोंद त्याच्या नावावर आहे.त्यांच्या या कार्याची दखल द डायसेस ऑफ एशिया चेन्नई तामिळनाडू यांनी घेऊन त्यांना डॉक्टरेट इन अथलेटीक ही पदवी दिली आहे. अथर्वला अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रादेशिक राज्यस्तरीय प्रादेशिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन तर्फे भारतीय क्रिडा रत्न पुरस्कार २०२२ बाल रत्न क्रीडा रत्न क्रीडा भूषण बेस्ट अथलेट्ऑफ द इयर रायझिंग स्टार बेस्ट अचीवर अशा अनेकविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वेळेचे योग्य नियोजन व्यायाम आणि आहाराचे योग्य नियोजन असे करत अथर्वने इथपर्यंतचा प्रवास केला आहे.जगातील सर्वात अवघड असणारी ट्रायथलॉन स्पर्धा कमी वयात आणि कमी वेळेत पूर्ण करून त्यामध्ये विश्वविक्रम केल्याबद्दल दिगे फाउंडेशन तर्फे माननीय सौ. मधुरिमा राजे छत्रपती सो यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे त्याचा विश्वविक्रमाचे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला संस्थेचे अध्यक्ष समाजभूषण सदानंद दिघे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळीअथर्वला समाजरत्न भिमक्रांती विशेष आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जिद्द चिकाटी परिश्रम व वेळेचे नियोजन असेल तर यशाला गवसणी घालता येते अथर्वने या गोष्टीला प्रथम प्राधान्य दिले आहे यासाठी अथर्वला प्रशिक्षक पंकज रावळू आशिष रावळू
क्रीडाशिक्षक विक्रमसिंह पाटील रविराज पवार यांचे मार्गदर्शन व कॉलेजच्या प्राचार्य माहेश्वरी चौगुले यांचे प्रोत्साहन व संस्थेचे अध्यक्ष संदीप नरके यांचे सहकार्य लाभले आहे. आई डॉ.सौ.मनीषा गोंधळी वडील डॉ. संदीप गोंधळी व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे असे अथर्व ने बोलून दाखवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन कोल्हापूर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि न्यायालयाचे याचिका कर्ते दिलीप पाटील यांचे काल शनिवारी कराड नजीक...

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी ३६ फुटावर कोल्हापूर/२० जुलै (वार्ता.) - कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्‍या पावसाने कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणी...

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

Recent Comments