कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदान प्रारंभ ११ वाजेपर्यंत २०% तर दुपारी १ वाजेपर्यंत ३७.२९% मतदान
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया ही पार पडत आहे.चुरशीच्या प्रचाराची रणधुमाळी संपली असून आज ही मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाची ही प्रक्रिया सुरू झाली असून सकाळी अकरा वाजता २०% आणि दुपारी १ वाजेपर्यंत एकूण ३७.२९% इतके मतदान झालेले आहे. मतदान केंद्राबाहेर मतदारांनी मतदान करण्यासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्य. पोलिस बंदोबस्तामध्ये आजची ही कोल्हापूरची उत्तर निवडणुक पार पडत आहे मतदान केंद्राबाहेर बूथ उभारणी केली गेली असून याठिकाणी मतदारांना मतदान यादीतील क्रमांक सांगितला जात आहे एक वाजेपर्यंत झालेल्या मतदानानंतर दुपारी उन्हाच्या झळा वाढत चाललेल्या आहेत त्यामुळे मतदानाची प्रक्रिया ही थोडीशी थंडावली असून दुपारनंतर पुन्हा एकदा ही प्रक्रिया गतीने सुरू होईल. आज राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर ,कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी उभे असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव व भाजपचे उमेदवार सत्यजित नाना कदम यांनी आपले मतदान केलेले आहे.