अत्याधुनिक सीबीसिटी मशिन प्रथमच कोल्हापुरात शहा एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड क्लिनिकमध्ये दाखल
कोल्हापूर/ प्रतिनिधी: कोल्हापुरातील शाहूपुरी येथील शहा एक्स-रे व अल्ट्रासाउंड क्लिनिक या डायग्नोस्टिक सेंटर मध्ये प्रथमच केअर स्ट्रीम कंपनीचे अत्याधुनिक सीबीसिटी मशीन म्हणजे कोन कॉम्प्युटराईज्ड टोमोग्राफी मशीन दाखल झाले आहे. याचा फायदा कोल्हापुरातील सर्व डेंटिस्ट म्हणजे दंतवैद्यांना तसेच
फॅसिओमॅक्झिलरी सर्जन्सना होणार आहे.या मशिनचा उद्घाटन सोहळा १३ एप्रिल रोजी बुधवारी सकाळी ११.०० वाजता होणार असून फॅसिओमॅक्झिलरी रेडिओलॉजिस्ट
डॉ.कुहू मजुमदार यांचे व्याख्यान त्याच दिवशी आयोजित केले आहे, अशी माहिती शहा डायग्नोस्टिक सेंटरचे प्रमुख डॉ. दिलीप शहा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गेल्या ४० वर्षापासून शहा एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड क्लिनिक कोल्हापूरला अचूक निदान सुविधा देत आहे. यामध्ये नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे मशीन दाखल झाल्याने कोल्हापूरच्या वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या मशीनमुळे चेहरा व जबड्याची सर्जरी करण्यासाठी तसेच दंतरोपणासाठी आवश्यक माहिती ही अचूक, तात्काळ तसेच 3डी (थ्रीडी) स्वरूपात इमेजमध्ये मिळते व सर्जन्सना अतिशय बारकाईने जबड्याचा अभ्यास करून त्यावर योग्य उपचार अथवा शस्त्रक्रिया करणे सोयीचे झाले आहे.
अपघातात जबड्याला मार लागणे, फ्रॅक्चर, कॅन्सरच्या गाठी किंवा इतर काही कारणांमुळे म्हणजेच पूर्ण तोंड न उघडणे, तंबाखू सेवनाने बिघडलेला जबडा सुस्थितीत आणणे, ट्यूमर, इन्फेक्शन,टीएम जॉईन खराब होणे म्हणजे अन्न चावता न येणे या सर्व बाबींसाठी या मशीनद्वारे स्कॅनिंग करून त्याची थ्रीडी इमेज मिळते. त्यामुळे इन्फेक्शन कुठे पर्यंत झाले आहे हे समजते. पूर्वीपेक्षा या अत्याधुनिक मशीनमुळे डेंटिस्ट व सर्जन्सना सखोल माहिती मिळणार आहे. जबडा सुस्थितीत नसेल किंवा दातांच्या आजारांमुळे माणसाचे खाणे कमी झाले तर त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतो आणि प्रकृती खालावते. यासाठी परिपूर्ण, अचूक, वेगवान, ओपीजी व 3डी इमेज देणारे सीबीसीटी मशीनमुळे सर्व प्रकारच्या जबड्याच्या व दातांच्या आजारांवर अगदी सहज व सखोल उपचार करणे सोपे झाले आहे. असेही रेडिओलॉजिस्ट डॉ. दिलीप शहा यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला सौ. पूनम दि. शहा,जनसंपर्क अधिकारी दयानंद पाच्छापुरे, व सर्व कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.