होणार आज मतदान
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभेची मतदान प्रक्रिया ही उद्या पार पडत आहे.यासाठी मतदान हे आज होत असून उत्तर विधानसभा निवडणूक मध्ये आता पहिला आमदार महिला होणार का भाजपचे कमळ याठिकाणी फुलणार यावर चर्चा होत आहेत. या विधानसभा निवडणुकीसाठी पैसे वाटताना अनेक जण सापडले आहेत हा प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे हे उघड उघड समोर आले आहे अतिशय राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेची ही निवडणूक होत गेली असल्याने निवडणुकीची जोरदार चर्चा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य व देशातच होत आहे.उद्या १२ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानाकडे आणि १६ एप्रिल रोजी होणाऱ्या मतमोजणी कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे त्यामुळे कोणाचे पारडे जड आहे हे १६ रोजी मतमोजणीतून होणार आहे. उद्या होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत ११ एप्रिल उद्या होणारी मतदान ही राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे असून महाविकास आघाडी व भाजपकडून या निवडणुकीचा जोरदार प्रचार केला गेला आहे. अत्यंत चुरशीने झालेल्या प्रकारांमधून कोणाच्या पदरात आमदारकीचे हे पद पडणार हे १६ रोजी होणाऱ्या मतमोजणी दिवशी कळणार असले तरी दोघाही उमेदवारांचा प्रचार हा अत्यंत जोमाने झालेला आहे दोन्ही कडील पक्षाच्या नेत्यांनी कोल्हापूर शहरांमध्ये येऊन या दोघाही उमेदवारांचा प्रचार केलेला आहे भाजपचे अनेक दिग्गज नेते मंडळी कोल्हापूर मध्ये येऊन गेलेले आहेत. तर महाविकास आघाडीचे ही काही दिग्गज नेते कोल्हापूर जिल्हा शहरांमध्ये येऊन प्रचार करून गेलेले आहेत. त्यामुळे पहिला महिला आमदार म्हणून जयश्री जाधव यांच्या नावाला गुलाल लागणार की भाजपचे सत्यजित नाना कदम यांच्या नावाला गुलाल लागणार हे प्रत्यक्षरीत्या १६ एप्रिल रोजी होणाऱ्या मतमोजणी तून लक्षात येणार आहे. जनतेच्या मनामध्ये काय चालले आहे हे अजूनही गुलदस्त्यातच आहे हा गुलदस्ता उद्या उमेदवाराच्या नावासमोर शिक्का करून बाहेर पडणार आहे आणि तो मतमोजणीमधून समोर येणार आहे. या होणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे जनताही या निवडणुकीच्या इकडे लक्ष देत आहे एकूणच उत्तर विधानसभा निवडणुक ही सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची होत चाललेली आहे काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला सहानुभूती मिळते की नाना कदम यांच्या नावालासहानुभूती मिळते हे एका दिवसानंतर काय होणार आहे प्रचार हा जोरदार केला गेला आहे त्यामुळे कोणाचा किती प्रचार झाला निकालानंतर जरी कळणार असले तरी राजकीय दृष्ट्या आत्तापर्यंत कधीही इतका जोमाने प्रचार कोणत्याही निवडणुकीमध्ये झालेला नाही इतका प्रचार कोल्हापूरच्या उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेला आहे. आणि इतकी प्रतिष्ठा पणाला कशी काय लागली गेली याबद्दल ही जनतेच्या मनामध्ये चर्चा होत आहे व याची उत्सुकताही लागून राहिली आहे.