Monday, July 15, 2024
Home ताज्या कोल्हापूर हेरिटेज कमिटी नियुक्ती आंधळा कारभार नको

कोल्हापूर हेरिटेज कमिटी नियुक्ती आंधळा कारभार नको

कोल्हापूर हेरिटेज कमिटी नियुक्ती आंधळा कारभार नको .

कोल्हापूर/प्रतिनिधी : छ . शाहू महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी असलेले आणि छ. शाहू महाराजांच्या कृपादृष्टीने कोल्हापूर शहर हेरिटेज वस्तूंचे शहर म्हणजे कोल्हापूर . सदर हेरिटेज वास्तूंचे जतन होण्यासाठी २००४ पासून कोल्हापूर महानगरपालिकेच्याअंतर्गत केंद्र व राज्य शासन यांच्या नियमानुसार हेरिटेज कमिटी गठित केली जाते परंतु सदर हेरिटेज समिती गठीत करीत असताना केंद्र व राज्य सरकारच्या कोणत्याही नियमांचे पालन केले गेलेले नाही . त्यामुळे हेरिटेज कमिटी मध्ये महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे योग्य ते व पात्र नसलेल्या प्रतिनिधींची हेरिटेज कमिटीमध्ये नेमणूक केली जाते .अशा कमिटी मधील सदस्य हे केंद्र व राज्य सरकार च्या नियमाप्रमाणे , शैक्षणिक पात्रतेनुसार , अनुभवाने ,ज्ञानाने योग्य त्या प्रक्रिया संदर्भात परिपूर्ण आहेत की नाहीत तसेच केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या नियमांचा कोणताही निष्कर्ष न लावता आज पर्यंत नेमणूक केलेले कमिटी सदस्य वशिल्याने व मनपा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे गठीत झाले आहेत .असा या भ्रष्टाचारी कमिटी सदस्य यामुळे कोल्हापूर शहरातील कित्येक हेरिटेज वास्तू केंद्र व राज्य शासनाच्या पुरातत्त्व खात्यातून निधी येऊन सुद्धा कोल्हापूर हेरिटेज कमिटी सदस्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे वास्तूंचा निधी खर्ची पडला नाही .
कोल्हापूर हेरीटेज वास्तूंचा पुनर्विकास विकास आराखडा रखडला आहे .हसाया हेरिटेज कमिटीची मुदत सन मे २०२२ रोजी संपत असून इथून पुढे नवीन नियुक्ती होणारी हेरिटेज कमिटी ही कोल्हापूर महानगरपालिका प्रशासकसो यांनी केंद्र व राज्य शासनाच्या तंतोतंत नियमावलीप्रमाणे म्हणजेच दैनिक वृत्तपत्रातून जाहिरात देणे , तसेच सदर कमिटीत विनामोबदला काम करणाऱ्यांकमिटी सदस्यांची येणारे अर्ज प्रक्रियेत प्रशासन समिती नेमून शैक्षणिक पात्रता,अनुभव , ज्ञान इत्यादी आवश्यक माहितीची छाननी करून नवीन हेरिटेज समिती गठित करीत असताना गेली सतरा वर्षे समितीत ठाण मांडून बसलेल्या सदस्यांना, अनुभव व शैक्षणिक पात्रता , ज्ञान नसणारे कमिटी सदस्यांना परत संधी देण्यात येऊ नये .नवीन समिती गठित करताना केंद्र व राज्य शासनाच्या नियमांचे पालन केले गेले नाही तर मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा मेलद्वारे देण्यात आला आहे.
नगर विकास मंत्री
महाराष्ट्र राज्य .प्रशासकसो
कोल्हापूर महानगरपालिका याना कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.लहुजी शिंदे पप्पू सुर्वे महेश जाधव राजू मालेकर चंद्रकांत पाटील महेश लोखंडे आकाश शेलार रणजीत पवार भाऊ घोडके अशोक पवार रमेश मोरे शंकरराव शेळके चंद्रकांत सूर्यवंशी विनोद डुणुगं रमाकांत अँग्रे आदींची निवेदनावर नावे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments