Thursday, November 14, 2024
Home ताज्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची उद्या १० रोजी  निवडणूक तयारी पूर्ण, सोमवार दुपारपर्यंत...

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची उद्या १० रोजी  निवडणूक तयारी पूर्ण, सोमवार दुपारपर्यंत चित्र स्पष्ट  

कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची उद्या १० रोजी  निवडणूक तयारी पूर्ण, सोमवार दुपारपर्यंत चित्र स्पष्ट

कोल्हापूर/प्रतिनिधी : सराफ व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणाऱ्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची निवडणूक उद्या, रविवारी (ता. १०) होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कांतिलाल ओसवाल (केजी) यांनी आज दिली.
रविवारी सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत सराफ संघाच्या महाद्वार रोड येथील कार्यालयात चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये मतदान होईल. यासाठी एकूण ६८४ सभासद पात्र आहेत. दोन वर्षांसाठी पदाधिकारी निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीमध्ये एकूण १२ संचालक, एक अध्यक्ष व एक उपाध्यक्षपदासाठी मतदान करावयाचे आहे. विद्यमान अध्यक्ष स्वीकृत संचालक असतील. या वर्षी मारवाडी अध्यक्ष असल्याने अध्यक्षपदासाठी माणिक जैन व राजेश राठोड असे दोन उमेदवार आहेत. उपाध्यक्षपदासाठी विजय हावळ, सुहास जाधव व अनिल पोतदार (हुपरीकर) असे उमेदवार आहेत, तर संचालकांच्या १२ जागांसाठी १८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
दरम्यान, सोमवारी (ता.११) सकाळी ९ वाजता सराफ संघामध्येच मतमोजणी सुरू होईल. प्रथम संचालक मंडळ, त्यानंतर उपाध्यक्ष व शेवटी अध्यक्षपदाची मतमोजणी होणार असल्याचेही श्री. ओसवाल यांनी यावेळी सांगितले.  निवडणूक मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.
प्रचार शिगेला
प्रत्येक उमेदवाराने व्यक्तिगत पातळीबरोबर संबंधितांच्या माध्यमातून सभासदांशी संपर्क साधला आहे. आज शनिवार सराफ बाजार बंद असल्याने प्रत्येकाने अगदी सभासदांच्या घरी जाऊन संधी देण्याचे आवाहन केले.
ज्येष्ठांसाठी सुविधा
ज्येष्ठ सभासदांना चौथ्या मजल्यावर मतदान करण्यासाठी जाता येणे शक्य होणार नाही. त्यांच्यासाठी तळमजल्यावरच मतदान सुविधा करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पर्यटन हबद्वारे शहराचा विकास करणार – राजेश क्षीरसागर उत्तरेश्वर पेठ येथील प्रचारफेरीत प्रतिपादन

पर्यटन हबद्वारे शहराचा विकास करणार - राजेश क्षीरसागर उत्तरेश्वर पेठ येथील प्रचारफेरीत प्रतिपादन कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा आणि शहराला ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज...

एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करार

एल अँड टी एज्यु टेक सोबत घोडावत विद्यापीठाचा सामंजस्य करार अतिग्रे/प्रतिनिधी : संजय घोडावत विद्यापीठाने बी. कॉम, बीबीए, एमबीए, एम. टेक, सिविल इंजीनियरिंग शाखांसाठी चेन्नई...

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे...

महिलांचा सन्मान राखणाऱ्या आ. ऋतुराज पाटील यांना विजयी करा- मधुरिमाराजे छत्रपती

महिलांचा सन्मान राखणाऱ्या आ. ऋतुराज पाटील यांना विजयी करा- मधुरिमाराजे छत्रपती कोल्हापूर/प्रतिनिधी : सध्या महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र आमदार ऋतुराज...

Recent Comments