उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज होणार दालन खुले
कोल्हापूर /प्रतिनिधी : बांधकाम क्षेत्रातील सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा व घटकांची एकत्र माहिती देणाऱ्या क्रीडाई- कोल्हापूर आयोजित ‘ दालन २०२२ ‘ प्रदर्शनाचा प्रारंभ शाहूपुरी जिमखाना मैदानावर आज शुक्रवारी सायंकाळी ६ वा . उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन करून होणार आहे . अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ असणार आहेत तर खासदार संजय मंडलिक , संभाजीराजे छत्रपती आमदार पी . एन पाटील , ऋतुराज पाटील आदी उपस्थित असणार आहेत.
प्रदर्शनात १६० संस्था सहभागी होणार असून , यात वन बी. एच. के ते पेंट हाऊस , रो – बंगलो ते सेकंड होम पर्यंतच्या क्षेत्रातील व गृहप्रकल्पांची माहिती मिळणार आहे . स्थानिकांसह सांगली , सातारा बेळगांव , कोकण , गोव्यातील नागरिकांसाठीही पर्वणी असेल खास कोल्हापुरी ते दाक्षिणात्य खाद्यपदार्थाच्या स्टॉलचीही मेजवानी आहे .या प्रदर्शनाचे प्लॅटिनम प्रायोजक महालक्ष्मी टीएमटी बार असून कजारिया टाईल्स व शिंडलर लिफ्टस् हे गोल्ड प्रायोजक आहेत . सहभागी बँकांसह वित्तीय संस्था ग्राहकांना कमी कागदपत्रात अर्थसहाय्य उपलब्ध करणार आहेत . नियोजनासाठी क्रीडाई अध्यक्ष विद्यानंद बेडेकर , उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर , चेतन वसा , सचिव प्रदीप भारमल यांच्यासह खाजानिस गौतम परमार , दालन उपाध्यक्ष अजय डोईजड , सचिव सोमराज देशमुख , खजिनदार संदीप मिरजकर , श्रीधर कुलकर्णी , निखिल शहा , पवन जामदार , स्टॉल समिती प्रमुख संदीप पवार , जनसंपर्क समिती प्रमुख विक्रांत जाधव आदरातिथ्य समिती प्रमुख संग्राम दळवी , संग्राम पाटील , रवी माने , गंधार डिग्रजकर आदी कार्यरत आहेत .