Tuesday, October 15, 2024
Home ताज्या वेश्याव्यवसाय प्रकरणी चौघांना सक्तमजुरीची शिक्षा

वेश्याव्यवसाय प्रकरणी चौघांना सक्तमजुरीची शिक्षा

वेश्याव्यवसाय प्रकरणी चौघांना सक्तमजुरीची शिक्षा

कोल्हापूर/प्रतिनिधी : मुलींच्‍या गरिबीचा फायदा घेवून त्‍यांना वेश्‍या व्यवसायात आणणार्‍या तसेच एका मुलीची विक्री करणार्‍या टोळीला न्‍यायालयाने सक्‍तमजुरीची शिक्षा सुनावली. पुण्‍यात डीजे ऑपरेटींगचा कोर्स शिकणाऱ्या नेपाळी मुलीची या टोळीतील महिलांनी विक्री केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. दुसरी मुलगी वडिलांच्‍या आजारपणामुळे यामध्‍ये ओढली गेल्‍याचे कारण पुढे आले आहे. जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश एस. आर. पाटील यांच्‍यासमोर झालेल्‍या सुनावणीत आरोपी सरीता रणजीत पाटील (वय ४१, रा. पाचगाव, करवीर), विवेक शंकर दिंडे (३१, रा. राजारामपुरी), मनिषा प्रकाश कट्टे (३०, रा. भोसलेवाडी, कोल्‍हापूर) या तिघांना १० वर्षे सक्‍तमजुरी व २९ हजार रुपये दंड ठोठावला. वैभव सतिश तावसकर (२८, रा. पांगरी, सोलापूर) याला दोन वर्षे सक्‍तमजुरी व ४ हजारांचा दंड सुनावण्‍यात आला. आरोपी सरीता पाटील ही कळंबा येथील एका अपार्टमेंटमधील फ्‍लॅटमध्‍ये कुंटणखाना चालवत होती. विवेक दिंडे व वैभव तावसकर हे गरजू व असहाय्य महिलांना वेश्‍या व्‍यवसायासाठी सरीता पाटील हिच्‍याकडे घेवून येत होते. २०१९ मध्‍ये करवीर पोलिसांनी कळंबा येथील या कुंटणखान्‍यावर छापा टाकून पीडित मुलीची सुटका केली होती. करवीर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल होवून याची सुनावणी जिल्हा व सत्र न्‍यायालयात चालली.

नेपाळी मुलीची विक्री –

पोलिसांनी सुटका केलेल्‍या पीडित मुलींपैकी एक मुलगी नेपाळची आहे. ती पुण्यामध्ये डीजे ऑपरेटरचे शिक्षण घेत होती.  तिची मोठी बहीण कोल्हापूरमध्‍ये राहण्‍यास होती. २०१९ मध्‍ये फ्रेन्‍डशिप डे निमित्त आयोजित एका पार्टीसाठी ती कोल्हापुरात आली होती. ती मेकअपसाठी ताराबाई पार्कातील पार्लरमध्‍ये गेली असता आरोपी मनिषा कट्टे हिने ‘तु दिसायला छान आहेस, तुला जॉबपेक्षा जास्त पैसे मिळतील’ असे आमिष दाखवले. तिला पाचगाव येथील बंगल्‍यात नेवून आरोपी सरिताची ओळख करून दिली. त्यानंतर पीडित मुलीला जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले. तसेच मनिषाने तिची सरीता पाटील हिला विक्री केल्‍याचेही समोर आले.

वडिलांच्‍या आजारपणाचा गैरफायदा-

दुसरी पीडित मुलगी ही अत्यंत गरीब घरातील आहे. तसेच तिचे वडील नेहमी आजारी असल्‍याने त्‍यांच्‍या औषधोपचारामुळे तिला अडचणी होत्‍या. तीदेखील पार्लरच्‍या निमित्ताने आली असता सरीता पाटील हिच्‍याशी ओळख झाली. सरीता पाटील आणि विवेक दिंडे या दोघांनी तिला कळंबा येथील फ्‍लॅटवर नेवून वेश्‍याव्‍यवसायासाठी भाग पाडले.
हा खटला जिल्‍हा व सत्र न्‍यायालयात चालविण्‍यात आला. सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी दोन्ही पीडित मुलींसह एकूण अकरा साक्षीदार तपासले. पीडित मुलीनी चारही आरोपी विरुध्द घडलेली घटना सविस्तरप्रमाणे सांगितली. या दोन्ही मुलींची साक्ष, वैदयकीय अधिकारी डॉ वृषाली यादव, डॉ. मोहिनी देशपांडे, आशिष मोरे व डॉ शैलेश पाटील यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्‍या. साक्षीदारांचे जबाब व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राहय मानून न्‍यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली. तपासकामी पोलीस निरीक्षक सुनील पाटील, सागर पोवार, महिला कॉन्‍स्‍टेबल माधवी घोडके, ॲड. वंदना चिवटे यांनी सरकारी पक्षाला मदत केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद

जयश्री चंद्रकात (आण्णा) जाधव फाऊंडेशन आयोजित रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद डेलिया ग्रुप प्रथम : जैना ओसवाल गरबा क्वीनची मानकरी : महिलांनी लुटला नृत्याचा आनंद कोल्हापूर/प्रतिनिधी :...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे/प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई...

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट ‘नाद – द हार्ड लव्ह’ २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार

धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट 'नाद - द हार्ड लव्ह' २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार कोल्हापूर/प्रतिनिधी : २५ ऑक्टोबरला एक धडाकेबाज रोमँटिक अ‍ॅक्शनपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो...

११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद

शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र ११ ऑक्टोबर रोजी कोल्हापुरात १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यव्यापी निर्धार परिषद कोल्हापूर/प्रतिनिधी : शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समिती, महाराष्ट्र वतीने जिल्ह्यातील...

Recent Comments