Sunday, July 14, 2024
Home ताज्या खोटं बोल पण रेटून बोल या भाजपच्या प्रवृत्तीला कोल्हापूरकर थारा देणार नाहीत...

खोटं बोल पण रेटून बोल या भाजपच्या प्रवृत्तीला कोल्हापूरकर थारा देणार नाहीत – विजय देवणे

खोटं बोल पण रेटून बोल या भाजपच्या प्रवृत्तीला कोल्हापूरकर थारा देणार नाहीत – विजय देवणे

कोल्हापूर /प्रतिनिधी : खोटं बोल पण रेटून बोल या भाजपच्या प्रवृत्तीला कोल्हापूर उत्तरमधील जनता थारा देणार नाहीत. जयश्री जाधव यांच्या विजयासाठी आघाडीचे सर्व नेते एकत्र आले असून त्यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ पदयात्रेप्रसंगी ते बोलत होते.
मंगळवार पेठेतील लाड चौक, हैदर गल्ली फिरंगाई तालीम, हिंद मंडळ मार्गे ही पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला नागरीकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आण्णांच्या कामाची पोहोच पावती जनता विजयाच्या रूपाने मला देईल अशा विश्वास जयश्री जाधव यांनी व्यक्त केला.
सर्वसामान्य जनतेमध्ये सहजपणे मिसळणा-या आण्णांनी सर्वांना आपले केले होते. आण्णांचे विकासकार्य ताकदीने पुढे नेण्यासाठी जयश्री वहिनींना संधी द्यावी असे आवाहन कॉग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केले. माजी महापौर सागर चव्हाण, जयश्री चव्हाण, रणजित माने, ॲङ कल्याणी माणगावे, प्रशांत जगदाळे, निखिल जाधव, अमर जरग, चेतन मोहिते, अरुण हेरवाडकर दिलीप वायदंडे, करण सकटे, अर्जुन सकटे, विनय बारवसे, प्रकाश दुकांडे, माणिक खांडेकर, लक्ष्मण पवार, कपिल सकटे, रामदास भाले, जितेंद्र सावंत, युवराज साळोखे, प्रशांत जगदाळे, रवी आवळे, अशोक मिस्त्री, स्वप्नील कांबळे, सतीश पाटील, पिल्लू जगदाळे यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्र पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments