Thursday, July 18, 2024
Home ताज्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र करवीर व करवीर तहसीलदार पुरवठा विभाग यांच्यावतीने जागतिक ग्राहक...

ग्राहक पंचायत महाराष्ट्र करवीर व करवीर तहसीलदार पुरवठा विभाग यांच्यावतीने जागतिक ग्राहक दिन साजरा

ग्राहक पंचायत महाराष्ट्र करवीर व करवीर तहसीलदार पुरवठा विभाग यांच्यावतीने जागतिक ग्राहक दिन साजरा

कोल्हापूर /प्रतिनीधी : जागतिक ग्राहक दिन* सप्ताहा निमित्ताने ग्राहक पंचायत महाराष्ट्र करवीर तालुक्याच्या वतीने गणेश मंदिर हॉल पाचगाव आर.के.नगर, ता.करवीर येथे जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील यांचे मार्गदर्शन खाली सदर कार्यक्रमाचे नियोजन करवीर तालुका अध्यक्ष श्री.उमेश कुंभार, जिल्हा सल्लागार श्री.सुधाकर भदरगे व विजय टकले यांनी केले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून करवीर पुरवठा अधिकारी मां. दत्तात्रय पाडळकर साहेब व कायदेशीर सल्लागार अँड राजेंद्र वायगणकर* उपस्थित होते. यावेळी ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर पाहुण्यांची ओळख विजय टकले यांनी करून दिली व स्वागत श्री.सुधाकर भदरगे यांनी करून दिली. यानंतर जिल्हा संघटक सुरेश माने यांनी ग्राहक पंचायत म्हणजे काय, ग्राहक पंचायतचे उदिष्ट, ग्राहक पंचायतचे काम, ग्राहक पंचायत कशा पद्धतीने शासना बरोबर ग्राहक प्रबोधन करणेचे काम करते, ग्राहकांचे हक्क याविषयावर थोडक्यात माहिती दिली.
यानंतर प्रवासी महासंघाचे अध्यक्ष श्री.संजय पोवार यांनी सायकल प्रवास ते विमान प्रवासात प्रवाश्यांची होणारी फसवणूक कशी टाळायची, प्रवाश्यांनी प्रवासात घ्यावयाची काळजी, प्रवाश्यांचे हक्क, याविषयी मार्गदर्शन केले.यानंतर सदस्य संपत पाटील यांनी गॅस सिलिंडर घेताना ऑनलाईन पध्दतीने बुक करून घ्यावे, शेतकर्यांनी लागवड खरेदी करताना कोणती खबरदारी घ्यावी, वस्तू खरेदी करताना घ्यावयाची काळजी या विषयावर थोडक्यात मार्गदर्शन केले तसेच आपण एक जागृत व सुज्ञ ग्राहक आहोत हे दर्शविणे साठी एक सिंबाॅल किंवा बिल्ला लावुन खरेदीस गेलो तर आपली फसवणूक होऊ शकनार नाही या पद्धतीचे नियोजन करावे अशी सुचना केली.
यानंतर सोसायटी नं.४ चेअरमन व गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ. विजय शिंदे व पाचगावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य
मा. संग्राम पोवाळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले . ग्राहक जनजागृती संबधित कार्यक्रम पाचगाव मध्ये असा पहिल्यांदाच होत आहे. ग्राहक तक्रार कुठे करू शकतो याबाबत माहिती मिळावी व रेशन धान्य दुकान यांचे कडून ग्राहकांना मिळणाऱ्या सेवा याबाबत ही मनोगत व्यक्त करून ग्राहक पंचायतचे कार्यास शुभेच्छा दिल्या.
यानंतर प्रमुख पाहुणे पुरवठा अधिकारी पाडळकर साहेब यांनी सांगितले की कोरोना काळात समाजातील वंचित घटक रेशन पासून कोणीही वंचित राहू नये यासाठी पुरवठा विभागामार्फत जास्तीत जास्त गरजू लोकांना धान्यं वाटप करणेत आले . ग्राहक पंचायत व शासन एकमेकांशी सलग्न राहून पुरवठा विभाग याच्या मार्फत ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याचे कामं सुरू आहे.भविष्यात करवीर तालुका पुरवठा विभाग याच्या मार्फत प्रत्येक गावात कॅप घेऊन रेशन संदर्भातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल व शासन स्तरावर लागेल ती मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यानंतर अँड. राजेंद्र वायगणकर यांनी ग्राहक दिनाची माहिती सांगताना अमेरीकेचे भूतपूर्व अध्यक्ष जाॅन एफ केनेडी यांनी १५ मार्च १९६२ रोजी अमेरिका पार्लमेन्ट मध्ये ग्राहकांच्या मुलभुत अधिकारा बाबत चर्चा घडवून आणली व नंतर संयुक्त राष्ट्र संघटनेने १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून घोषित केला त्यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्व, नविन कायद्यातील बदल, ग्राहक या याविषयी माहिती देताना सांगितले की मणुष्य जन्मा आगोदर पासून ते मृत्यू पश्चातही ग्राहक असतो, शिपाया पासुन ते राष्ट्रपती पर्यंत सर्वजन ग्राहकच असतात. सध्या ग्राहक फसवणूकही पेट्रोल, गॅस, राशन, विज या पुरती मर्यादित न रहाता ऑनलाईन पद्धतीनेही ग्राहकाची फसवणूक, दक्ष राहुन खरेदी करणे, विमा पाॅलिसी मध्ये होणारी फसवणूक टाळायची असेल तर फाॅर्म भरताना त्यातील नियम व अटी वाचुन सही केली पाहिजे, पक्के बिल घेणे जरूरीचे आहे. त्यातुनही ग्राहकांची फसवणूक होत असेल तल ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ग्राहक पंचायत व ग्राहक न्यायालयात आपणास न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर आहे अशी ग्वाही दिली.
यावेळी आर.के.नगर मधील शासन मान्य धान्यं दुकानदार महेश माने यांनी ग्राहकांना चांगली सेवा देत असले बद्दल मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यांत आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सल्लागार सुधाकर भदरगे सर यांनी केले व आभार करवीर अध्यक्ष उमेश कुंभार* यांनी केले.यावेळी मोरेवाडी माजी सरपंच व विद्यमान सदस्या सौ. देसाई मॅडम, विजय पांगे, जिल्हा सचिव दादासो शेलार, करवीर उपाध्यक्ष संजय चव्हाण, संघटक विक्रम शिणगारे, बबण शिणगारे, जनार्दन पाटील, बाबासो जौंदाळ, भागवान मोरे महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments