अंश अकॅडमी इचलकरंजी पश्चिम महाराष्ट्रातील प्रथमच वातानुकूलित हाॅल कॅरमपटूं साठी इचलकरंजी मध्ये
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन( मुंबई)
कोल्हापूर जिल्हा अँम्युचर कॅरम असोसिएशन कोल्हापूर यांच्या मान्यतेने आपणांस कळविणेत अतिशय आनंद होतआहे की अंश अकॅडमी इचलकरंजी
यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूर सातारा , सांगली येथील उदयन्मुख कॅरमपटू उदयास यावे यासाठी शालेय,काॅलेज, क्लब मधील मुला-मुलींना, महिलां कॅरम खेळाडूंना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तज्ञ कॅरम प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॅरमपटू तयार व्हावे या उद्देशाने अंश अकॅडमी प्रयत्नशील आहे.अलीकडे सर्वच क्षेत्रात लहान मोठे हे आपला मोबाईल पहाणेतच वेळ घालून नवीन पिढी क्रीडाक्षेत्रात मागे पडत आहे.
या करिताच प्रथमच सातारा, सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नवीन कॅरमपटू नां वातानुकुलीत हाॅल (AC)
मध्ये सराव करणेची संधी अंश अॅकॅडमी च्या वतीने देण्यात येत आहे तरी या संधीचा फायदा शाळा कॉलेज,क्रीडा संस्थांनी जरूर घ्यावा. तसेच सर्व कॅरमपटूं नां प्रशिक्षण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे जे नियम,अटी प्रमाणे घेणेत येणार आहे.
प्रशिक्षण करिता येणारे सर्व मुला-मुलींनच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन होणार नाही याची काळजी अंश अकॅडमी वतीने घेणेत येईल.असे अंश कॅरम अकॅडमीचे प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख प्रशिक्षक सोमनाथ ऐनापुरे यांनी सांगितले. संपर्कासाठी सोमनाथ ऐनापुरे ८९७५७५१२०८,अमोल होगाडे ९९७५४३७८०० याठिकाणी संपर्क साधावयाचा आहे.