कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची निवडणूक जाहीर १२ एप्रिलला होणार मतदान
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आम.चंद्रकांत जाधव यांचे अचानक निधन झाल्याने त्यांना पूर्ण कार्यकाल पदावर राहण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे या जागेवर राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक येत्या १२ एप्रिल रोजी होत असून १६ एप्रिल रोजी याची मतमोजणी होणार आहे.आणि १७ मार्च पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची निवडणूक अखेर लागल्याने भाजपचा उमेदवार निवडणूक लढविणार आहे. त्यामुळे ही निवडणूक दुरंगीच अशी होणार आहे. शिवसेना मात्र यामध्ये कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे व महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.आचार संहिता आजपासून लागू झाली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होत आहे . पोटनिवडणूक निवडणुकीसाठी शिवसेना ,दोन्ही काँग्रेस ,भाजपा आप ,आणि शे .का .पक्ष हे पाच पक्ष रिंगणात उतरणार आहेत.या निवडणुकीत शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या सुविद्य पत्नी माजी नगरसेविका जयश्री जाधव या काँग्रेसच्या उमेदवार असणार आहेत.शिवसेनेकडून राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी आहे. राजेश क्षीरसागर यांनी निवडणूक लढवावी असा शिवसेनेच्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे .शहर शिवसेनेने तशी मागणी पक्षाकडे केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा अध्यक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव तसेच माजी नगरसेवक सत्यजित कदम व अजित ठाणेकर अशी नावे चर्चेत आहेत. आप आदमी कडून पश्चिम महाराष्ट्र विभाग प्रमुख संदीप देसाई तसेच शेतकरी कामगार पक्षाकडून ही उमेदवार लढणार असल्याचे चर्चेत आहे .