शिवसेनेचा उद्या दि.१३ रोजी पदाधिकारी मेळावा
कोल्हापूर / प्रतिनिधी : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेनेने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. शहरासह जिल्ह्यात शिवसेनेची ताकत असून, याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे. आगामी सर्वच निवडणुका शिवसेना मोठ्या ताकतीने आणि एकसंघपणे लढणार असून, या निवडणुकींच्या अनुषंगाने उद्या रविवार दि.१३ मार्च २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर येथे पदाधिकारी मेळाव्याचे* आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली. मेळाव्याच्या अनुषंगाने आज शिवसेना शहर कार्यालय शनिवार पेठ येथे आयोजित पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते.
यावेळी बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्वच आजी- माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी एकसंघ झाले आहेत. कोणताही मतभेद न ठेवता पक्ष वाढीचे धोरण सर्वांनी ठरविले आहे. आगामी होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेना सर्व ताकदीनिशी उतरणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी गेल्या दोन वर्षातील कामाच्या जोरावर देशातील पहिल्या पाच मुख्यमंत्र्याच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे, ही बाब शिवसैनिकांसाठी अभिमानाची आहे. पक्षप्रमुखांचे निर्णय हिताचेच असल्याचे वेळोवेळी सिध्द होत आहे. त्यांचे काम घरोघरी पोहचविण्याची जबाबदारी शिवसैनिकांची असून, यातून मतदारांपर्यंत पोहचण्याची संधी इच्छुकांना मिळणार आहे. शहरात शिवसेना सक्षम असून, उद्याचा मेळावा यशस्वी करण्यासाठी तमाम शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ही श्री.क्षीरसागर यांनी केले.
या मेळाव्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम.मा.श्री.उदय सामंत, मा.परिवहन मंत्री व शिवसेना नेते आम.मा.श्री.दिवाकर रावते, शिवसेना संपर्कप्रमुख श्री.अरुणभाई दुधवडकर, सहसंपर्कप्रमुख खास.मा.श्री.संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार आदी प्रमुख मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.*
या बैठकीस शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, माजी जिल्हाप्रमुख रवीभाऊ चौगुले, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक रविकिरण इंगवले, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, माजी नगरसेवक राजू हुंबे, माजी नगरसेवक अजित मोरे, दीपक गौड, किशोर घाटगे, अभिषेक देवणे, हर्षल सुर्वे, महिला आघाडी शहरसंघटक सौ.मंगलताई साळोखे, श्रीमती पूजा भोर, सौ.गौरी माळदकर, सौ.पूजा कामते, सौ.मंगल कुलकर्णी, सौ.शाहीन काझी आदी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.