वायु डाइनटेक अँप प्रिझेंट्स केएससी रगेडियन कोल्हापूर रन पावर्ड बाय एस. जे.आर टायर्स कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉनसाठी त्वरित नोंदणी करा
कोल्हापूर/प्रतिनिधी : शाहूनगरी कोल्हापूरला असणाऱ्या क्रीडा क्षेत्राच्या प्रदीर्घ परंपरेमुळे कोल्हापूर शहर फिट सिटी म्हणून नावारूपाला आले आहे. पारंपरिक खेळापासून ते अत्याधुनिक साहसी खेळांमध्ये इथल्या खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत दबदबा निर्माण केला आहे. या क्रीडा परंपरेला प्रोत्साहन आणि पाठबळ देण्याबरोबरच नवोदित खेळाडू घडविणाच्या उद्देशाने वायु डाइनटेक अँप प्रिझेंट्स केएससी रगेडियन कोल्हापूर रन पावर्ड बाय एस. जे.आर टायर्स कोल्हापूर स्पोर्ट्स क्लब क्लब (केएससी) व रगेडियन क्लब यांच्या वतीने कोल्हापूरमध्ये ही कोल्हापूर अल्ट्रा रन मॅरेथॉन होत आहे.
भावी पिढी सुदृढ व सक्षम व्हावी या उद्देशाने करवीरनगरीत कोल्हापुरात लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी तालीम परंपरा निर्माण करून ती विकसित केली. यापुढे जाऊन क्रीडानगरीचा भक्कम पाया रोवला. पारंपरिक खेळा प्रमाणेच नव-नवीन खेळांना प्रोत्साहन व पाठबळ दिले.लोकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी आणि प्रत्येक कोल्हापूरकर फिट व्हावा या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन केले जाते.या वर्षीची ही सहावी मॅराथॉन आहे. देश-विदेशातील स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी कोल्हापूर मध्ये येतात त्यामुळे येत्या २४ एप्रिल रोजी येथील पोलीस मैदान येथे पार पडणाऱ्या या मॅरेथॉनसाठी त्वरित नोंदणी खेळाडूंनी करावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
केएससी रगेडियन कोल्हापूर रन ही केवळ क्रीडा स्पर्धा नसून शहराचा कार्निव्हल आहे, ज्यामुळे लोकांचा एक मोठा वर्ग एकत्र येतो. शहराच्या क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि कोल्हापूर रनला भारतातील प्रमुख मॅरेथॉन बनवणे आणि खेळाडूंना आयुष्यभराचा अनुभव देणे हा आमचा मुख्य हेतू असे आकाश कोरगावकर व चेतन चव्हाण यांनी सांगितले आहे.
स्पर्धेचे अंतर व मार्ग असा आहे
५ – कि. मी,१० – कि. मी,२१- कि. मी,४२- कि. मी,व ५०- कि. मी असे पाच गटात स्पर्धा होत आहे.तर वयोगट हे १८ वर्षाच्या आतील पुढे १८ ते ३४,३५ ते ४०,४१ ते ६५ व पुढे ६५ वर्षावरील सर्व महिला व पुरुष गट असणार आहेत. ५ किलोमीटर स्पर्धा पोलीस ग्राऊंड वरून सुरू होऊन ती कावळा नाका आणि पुन्हा पोलीस ग्राऊंड,१० किलोमीटरची स्पर्धा ही पोलीस ग्राऊंड सुरू होऊन ती केएसबीपी चौक आणि पुन्हा पोलीस ग्राऊंड,२१ किलोमीटरची स्पर्धा ही पोलीस ग्राऊंड येथे सुरू होणार ती एयरपोर्ट आणि पुन्हा पोलीस ग्राउंड,४२ किलोमीटरची स्पर्धा ही पोलीस ग्राऊंड येथे सुरू होणार ती एअरपोर्ट ला दोन राउंड पूर्ण करावयाचे आहेत.तर ५० किलोमीटरची स्पर्धा ही पोलीस ग्राऊंड येथे सुरू होणार आहे ती अंबाबाई मंदिर पुन्हा पोलीस ग्राऊंड येथे येऊन पुन्हा एअरपोर्ट दोन राउंड असे अंतर पार करावयाचे आहे.
तर स्पर्धेत नाव नोंदणी केलेल्या सर्व स्पर्धकांना टी-शर्ट, मेडल, नाष्टा, सर्टिफिकेट, गुडी बँक, रेसचे फोटो,टाईम चिप आदी सुविधा दिल्या जाणार आहेत.शिवाय
मॅरेथॉनमध्ये स्पर्धकांना झुंबा, नाशिक बेल, रॉक बँड, पोलीस बँड, मर्दानी खेळ,ढोल ताशा,पारंपरिक लेझीम,वाद्य आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.स्पर्धेचे मुख्य प्रायोजक हे वायु डाइनटेक अँप व एस. जे.आर टायर हे आहेत तर दैनिक पुढारी हे स्पर्धेचे असोसिएट पार्टनर आहेत. आणि सहप्रायोजक हे
ब्लोमिंग बड्स पब्लिक स्कुल,एचपी हॉस्पिटँलिटी,स्वस्तिक कन्स्ट्रक्शन,कोल्हापूर टूरिझम,जे.के.ग्रुप,आयनॉक्स,धनश्री पब्लिसिटी आदी आहेत.तर टोमॅटो एफ. एम. रेडिओ पार्टनर आहेत आणि बी. न्युज मीडिया पार्टनर आहेत.आता पर्यंत मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर कोल्हापूर शहरात होणाऱ्या या स्पर्धेसाठी त्वरित नाव नोंदणीसाठी रगेड कब किड्स फिटनेस अकॅडमी तावडे लॉन मेमोरियल चर्चच्या मागे सासने ग्राउंड येथे दुपारी ४ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत नावनोंदणी करावयाची आहे तर अधिक माहितीसाठी www.kolhapurrun.com या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे.आणि ७७७६९८१५४८ आणि
७७२२०६७४७७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क हा साधावयाचा आहे असे आवाहन स्पर्धा संयोजकांनी केले आहे.
चौकट
मेक अ मूव्ह, मेक अ मार्क
कोल्हापूरच्या तांबड्या मातीतील रांगडा टायर म्हणजे एस जे आर टायर मागील दोन वर्षात आपल्या सर्वांनाच कोरोनाने फिटनेसचे महत्त्व समजवले आहे. त्यामुळे तरुण पिढीने फिजिकली फिट राहिले पाहिजे.कारण तरुण फिजिकली फिट असेल तर मेंटली परफेक्ट असतो.त्यामुळे जास्तीत जास्त युवापिढीने मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा यासाठी आम्ही दरवर्षी मॅरेथॉनमध्ये भाग घेत असतो. एस जे आर टायरचे श्री.सिद्धार्थ बन्सल यांनी सांगितले आहे