Wednesday, October 9, 2024
Home ताज्या  ५१ किलो वजनाची चांदीची मूर्ती सराफ संघ देवस्थान समितीकडे सुपूर्त करणार, उद्या...

 ५१ किलो वजनाची चांदीची मूर्ती सराफ संघ देवस्थान समितीकडे सुपूर्त करणार, उद्या १ मार्च रोजी काढली जाणार भव्य शोभायात्रा , ४ मार्च रोजी महायज्ञ  

५१ किलो वजनाची चांदीची मूर्ती सराफ संघ देवस्थान समितीकडे सुपूर्त करणार, उद्या १ मार्च रोजी काढली जाणार भव्य शोभायात्रा , ४ मार्च रोजी महायज्ञ

शोभायात्रेत नागरिकांसह तालीम, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा – अध्यक्ष कुलदीप गायकवाड

कोल्हापूर/प्रतिनिधी : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती प्रदानप्रसंगी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत नागरिकांसह तालीम, मंडळे, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडे अंदाजे ५१ किलो वजनाची चांदीची मूर्ती आहे. ती १ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता विधिवत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द केली जाणार आहे. त्या निमित्ताने अंबाबाई मंदिर परिसरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्ताने रांगोळ्यांसह आकर्षक रोषणाईही केली जाणार आहे.या संदर्भात अधिक माहिती देताना श्री. गायकवाड म्हणाले, सराफ संघाकडे ३१ वर्षांपासून करवीर निवासिनी अंबाबाईची चांदीची मूर्ती आहे. १९९० साली सराफ संघाचे अध्यक्ष सुरेंद्र कुलपती व त्यांचे सहकारी यांनी अंबाबाईच्या मूळ मूर्तीची झीज होत असताना चांदीची मूर्ती बनविली होती.२००८ साली तत्कालीन अध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सराफ संघात ही मूर्ती ठेवण्यात आली होती.त्यावेळीही ही मूर्ती देवस्थान समितीने ताब्यात घ्यावी असा आग्रह सराफ संघाने धरला होता मात्र त्यावेळी मूर्ती घेण्यास नकार देण्यात आला होता. दरम्यान,अंबाबाई मंदिरात असणाऱ्या मूळ मूर्तीचीही अभिषेकमुळे झीज होत आहे. याच कारणासाठी देवस्थान सचिव व जिल्हाधिकारी यांना या चांदीच्या मूर्तीची देण्याची संकल्पना मांडली गेली व त्यांनी ती तात्काळ मान्य केली त्यामुळे तब्बल ३१ वर्षांनी ही मूर्ती तिच्या मूळ व हक्काच्या ठिकाणी जात आहे याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही ही मूर्ती देण्याचा सर्व संमतीने निर्णय घेतला. त्यासाठी रीतसर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून परवानगी घेऊन मूर्ती प्रदान करीत आहोत. यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवडे यांचे बहुमोल सहकार्य मिळाले अशी माहिती सराफ संघ अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, एक मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता अंबाबाई मंदिर परिसरात मूर्तीसह शोभायात्रा निघेल. यावेळी रांगोळी, आकर्षक रोषणाईबरोबर वाद्यांचा गजरही असेल. यामध्ये नागरिकांसह तालीम, मंडळे, संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहनही अध्यक्ष गायकवाड यांनी केले आहे.यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संजय जैन, संचालक सुहास जाधव, सुरेश गायकवाड, सुरेंद्र पुरवंत, अमोल ढणाल, सुरेश राठोड आदी उपस्थित होते.

चौकट

शिवाय या कार्यक्रमासाठी कोणीही देणगी मागण्यास येतील त्याला कोणीही सहकार्य करू नये.आणि कोणीही अशा पद्धतीने कार्यक्रमासाठी देणगीची मागणी करू नये असे जाहीर आवाहनही सराफ संघ अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी केले आहे.

४ मार्चला महायज्ञ

दरम्यान, मूर्ती देवस्थान समितीकडे सुपूर्द केल्यानंतर गरुड मंडपामध्ये मूर्ती ठेवण्यात येईल. तिचा वापर दैनंदिन पूजा आणि अभिषेकसाठी केला जाणार आहे. त्यापूर्वी ४ मार्च रोजी मंदिरात मूर्तीला अभिषेक केला जाणार आहे. त्याचबरोबर महायज्ञाचेही आयोजन केले आहे. यामध्ये शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित सहकुटुंबे सहभागी होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री...

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्तुर येथील...

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा   कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी...

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा...

Recent Comments