Monday, July 15, 2024
Home ताज्या गव्याच्या धडकेत जखमी बाचीच्या विद्यार्थिनीची मंत्री मंत्री हसन मुश्रीफांकडून विचारपूस

गव्याच्या धडकेत जखमी बाचीच्या विद्यार्थिनीची मंत्री मंत्री हसन मुश्रीफांकडून विचारपूस

गव्याच्या धडकेत जखमी बाचीच्या विद्यार्थिनीची मंत्री मंत्री हसन मुश्रीफांकडून विचारपूस

गडहिंग्लज/प्रतिनिधी : बाची ता. आजरा येथील कु. शर्वरी सुनील कोंडुसकर या विद्यार्थिनीला दोन दिवसापूर्वी द गव्याने जोरदार धडक दिली होती. या धडकेत ती जखमी झाली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शर्वरीची दवाखान्यांमध्ये जाऊन चौकशी केली. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी गडहिंग्लजमधील देशपांडे हॉस्पिटलमध्ये जावून शर्वरीसह कुटुंबियांना धीर दिला.याबाबत अधिक माहिती अशी,
कु. शर्वरी ही आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व जुनियर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकते. दोन दिवसापूर्वी ती कॉलेज सुटल्यानंतर बस स्टॉपवर उतरून घरी चालत जात होती. शेतातील रस्त्याने जात असताना वाटेतच तिला गव्याने धडक दिली. या धडकेत शर्वरीला मानेच्या हाडाला जोरदार मार बसला. सोबत असलेल्या तिच्या दोन मैत्रिणी कु. स्नेहल कोंडुस्कर व कु. सानिका कोंडुस्कर या किरकोळ जखमी झाल्या. यावेळी देशपांडे हॉस्पिटलचे मुख्य संचालक डॉ. शैलेश देशपांडे, शर्वरीची आई सौ. सविता सुनिल कोंडुसकर, वसंत कोंडुसकर, महादेव पाटील, उत्तर आजराचे वनपाल बाळेश न्हावी, वनमजूर प्रवीण कांबळे, गुंडेराव पाटील, राजू खणगावे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments