भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात मोफत फिजीओथेरपी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर /प्रतिनिधी : जरग नगर येथील भालचंद्र चिकोडे ग्रंथालयात आज सदृढ गाव योजने अंतर्गत सावली केअर सेंटरच्या सहकार्यान मोफत फिजीओथेरपी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यास प्रचंड प्रतिसाद लाभला.पाठीचे कुबड, मणक्याचे, मेंदूचे विकार, लहान मुलांमध्ये सेरेब्रल पाल्सी अशा अजारांवर फिजीओथेरपी अत्यंत लाभदायी ठरत असलेमुळे ही थेरपी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे व त्यांच्या जीवनात आलेले नैराश्य कमी करणे यासाठी जीवनशैलील फरक करून समुपदेशनाने अत्यंत चांगला लाभ होत असल्यामुळे अनेक लोक याकडे वळत आहेत. आज या शिबिरात सर्व वयोगटातील अवालवृध्दानी लाभ घलेला.
सध्याच्या काळात मोबाईलचा अतिवापर धावपळीचे जीवन, टू व्हीलरचा ज्यादा वापर यामुळे मान आणि मणकेदुखी अशा समस्या सर्वांना जाणवत असून आजच्या या फिजिओथेरपीच्या उपचाराद्वारे, उपचाराच्या सोप्या पद्धतीने सर्वांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी मदत होईल असे मत भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी व्यक्त केले.
या मोफत फिजीयोथेरपी शिबिराचे उद्घाटन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सावली केअर सेंटरचे किशोर देशपांडे, डॉ. राजकुमारी नायडू यांच्या समवेत सर्व स्टाफ यांनी सहभाग घेतला. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी कृष्णात आतवाडकर, सचिन साळोखे, जयदीप मोरे, योगेश चिकोडेआदींनी परिश्रम घेतले.