कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : पर्यटन, पर्यावरण मंत्री नाम.श्री.आदित्य ठाकरे
करवीरवासीयांच्या वतीने नाम.श्री.आदित्य ठाकरेंचा चांदीची तलवार आणि श्री अंबाबाईची प्रतिमा देवून नागरी सत्कार
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यास नैसर्गिक देणगी लाभली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक समृद्ध ठिकाणे असून, सह्याद्री डोंगररांगा, नद्या, अभयारण्य, ऐतिहासिक तलाव, धरणे येथील नैसर्गिक संपन्नतेचे दर्शन घडवितात. या नैसर्गिक ठिकाणांसह श्री अंबाबाई मंदिर, महत्वाची धार्मिक स्थळे, ऐतिहासिक गडकिल्ले, पुरातन वास्तू या कोल्हापूरचे महत्त्व अधिकच अधोरेखित करतात. पर्यटन वृद्धीतून कोल्हापूर जिल्ह्याचा विकास व्हावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन मंत्री नाम.मा.श्री.आदित्य ठाकरे साहेब यांनी केले. जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीसाठी नाम.श्री.आदित्य ठाकरे यांच्यामार्फत पर्यटन विभागाकडून मंजूर निधीबद्दल करवीरवासीयांच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी चांदीची तलवार, श्री अंबाबाईची मूर्ती, पुष्पहार व शाल देवून नागरी सत्कार करण्यात आला.
शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन मंत्री नाम.मा.श्री.आदित्य ठाकरे साहेब दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज सकाळी मंत्री नाम.श्री.आदित्य ठाकरे साहेब यांनी श्री अंबाबाई मंदिर येथे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी शिवसेना शहर कार्यालय शनिवार पेठ येथे भेट देवून पदाधिकारी आणि शिवसैनिकांशी संवाध साधला. यावेळी शिवसैनिकांनी “जय भवानी, जय शिवाजी”, “नामदार आदित्य ठाकरे साहेब आगे बढो”, “शिवसेना जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी फटक्यांची आतषबाजी करीत पारंपारिक वाद्यांच्या गजरात मंत्री नाम.ठाकरे साहेबांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन मंत्री नाम.मा.श्री.आदित्य ठाकरे साहेब यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यानंतर शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन मंत्री नाम.मा.श्री.आदित्य ठाकरे साहेब यांचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी चांदीची तलवार, श्री अंबाबाईची मूर्ती, पुष्पहार व शाल देवून नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी निधी मंजूर झाल्याने आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासास चालना मिळणार आहे. मंजूर झालेल्या निधीबद्दल समस्त करवीरवासीयांच्या वतीने आपले आभारी असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी शिवसेना नेते, युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन मंत्री नाम.मा.श्री.आदित्य ठाकरे साहेब यांनी, पुढील काळातही कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी निधीची तरतूद करण्याची ग्वाही दिली. यासह उपस्थित लोकप्रतिनिधीना आप-आपल्या भागातील कामे सुचविण्याच्या सूचना करीत यास तात्काळ निधी देण्याबाबत आश्वासित केले.
यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नाम.श्री.उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, मा.आम.चंद्रदीप नरके, मा.आम.सत्यजित पाटील, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारुगले, भगिनी मंच अध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, सौ.दिशा ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, माजी स्थायी समिती सभापती नंदकुमार मोरे, माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, माजी परिवहन सभापती राहुल चव्हाण, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, इंद्रजीत आडगुळे, अभिषेक देवणे आदी शिवसेना, युवा सेना व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.