कोल्हापूर शहरात व जिल्ह्यात शिवजयंती जल्लोषात साजरी
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोरोना कालावधीच्या दोन वर्षाच्या कालावधी नंतर कोल्हापूर शहरात व जिल्ह्यात शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली.जय शिवाजी जय भचणी,शिवाजी महाराज की जय,अशा जयघोषात,फटाक्यांच्या अतिषबाजीत कोल्हापूर शहर व जिल्हा भगव्या पताकांनी सजले होते. सर्वत्र वातावरण शिवमय झाले होते.कोल्हापूर शहरात आणि जिल्ह्यात भगव्या तिरंग्यानी जिल्हा सजून गेला होता सर्वच मंडळांनी आपल्या मंडळाच्या ठिकाणी शिवाजी महाराजांची प्रतिकृती उभी करून दिवसभर पोवाडे शिव जन्म सोहळा प्रसाद वाटप याच बरोबर अन्य सांस्कृतिक कार्यक्रम मर्दानी खेळ असे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. शिवसैनिकांचा दिवसभर जल्लोष पहावयास मिळाला.दिवसभर लहान मुलांचा व शिवजयंतीनिमित्त फटाक्यांची आतषबाजी व जल्लोष होता.
शिवाजी पेठ शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक कोल्हापूर शहरात काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये बैलगाड्या होत्या. शिवाजी तरुण मंडळाच्या वतीने सोळा फुटी भव्य शिवाजी महाराजांची प्रतिकृती उभी करण्यात आली होती. त्या ठिकाणी दिवसभर छोट्या मावळ्यांना शिवाजी महाराजांना घेऊन बालचमुनी व पालकांनी गर्दी केली होती. कोल्हापूरच्या रस्त्यांवर लोकांचा ओढा शिवाजी महाराजांच्या प्रतिकृती पाहण्यासाठी सायंकाळी गर्दी झाली होती. शिवाजी चौकातही पुतळ्याभोवती लोकांची गर्दी होती. बालचमु शिवाजी महाराज व लहान मुली जिजाऊंच्या वेशभूषेत सजली होती. शिवाजी तरुण मंडळ यांनी काढलेल्या मिरवणुकीमध्ये बैलगाड्यांवर शहरातील समस्यांचे फलक लावण्यात आले होते.घोड्यांवर सजीव मावळे सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावर शहरात नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती ही मिरवणूक बिनखांबी गणेश मंदिर,पापाची तिकटी,शिवाजी चौक,मिरजकर तिकटी अशी काढण्यात आली यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर शहरात सायंकाळी ठीक ठिकाणी मंडळांच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त होता मोठ्या प्रमाणात लोक शिवजयंती पाहण्यासाठी बाहेर पडले होते. आज कोल्हापूर शहरासह जिल्ह्याचे वातावरण हे शिवमय झाले होते मंडळांच्या ठिकाणी शिवजयंती साजरी केली गेली त्या ठिकाणी दिवसभर पोवाडे शिवाजी महाराजांच्यावर आधारित गाणी दिवसभर लावण्यात आली होती.