Sunday, July 14, 2024
Home ताज्या ‘ नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार श्री.सचिन खेडेकर यांना जाहीर ’

‘ नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार श्री.सचिन खेडेकर यांना जाहीर ’

‘ नटश्रेष्ठ जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार श्री.सचिन खेडेकर यांना जाहीर ’

 

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूरचे कलाकार नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त्य दिला जाणारा १२ वा कलायात्री पुरस्कार यंदा मराठी,हिंदी,तमिळ,तेलगू,मल्याळम,गुजराथी,इंग्रजी अशा
विविध भाषांतून लक्षणीय भूमिकेतून अभिनयप्रवास करणाऱ्या श्री.सचिन खेडेकर या रंगकर्मीना जाहीर झाला आहे. १ मार्च २०२२ रोजी सायं.५ वाजता शाहू स्मारक भवन,दसरा चौक येथे पुरस्कार वितरण होणार आहे.
शाल,श्रीफळ,सन्मानपत्र,सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दानवे परिवारातर्फे कोल्हापूरात गेली ३६ वर्षे सांस्कृतिक उपक्रमाद्वारे जयशंकर दानवे या कलाकाराचे स्मरण केले जाते. २०११ पासून नाटक,चित्रपट,दूरदर्शन या माध्यमावर पकड असणाऱ्या रंगकर्मींना त्यांच्या नावे
कलायात्री पुरस्कार देण्यात येतो. आजपर्यंत श्री.दिलीप प्रभावळकर,डॉ.मोहन आगाशे,सदाशिव
अमरापूरकर,शरद पोंक्षे,अरुण नलावडे,सुबोध भावे,प्रशांत दामले,डॉ.गिरीश ओक,भरत जाधव,अविनाश व ऐश्वर्या नारकर,महेश कोठारे या रंगकर्मींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
मराठी रंगभूमीच्या तालमीतून तयार झालेले सचिन खेडेकर हॉलीवूड,बॉलीवूड,तसेच टॉलीवूड मध्येही सिने-नाट्य क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत. काकस्पर्श,कोकणस्थ अन मराठी अस्मिता जपणाऱ्या मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशा भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टी त्यांनी गाजवली. तसेच जिद्दी,मुझसे दोस्ती करोगे,सिंघम,बादशहा,अस्तित्व,तेरे नाम,क्रिश ३ सध्याचा गाजणारा अंतिम अशा हिंदी
चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष लक्षणीय ठरल्या.विविध भाषातील चित्रपटातून त्यांच्या भूमिका पाहिल्या की वाटते या कलाकारात सर्वच भाषिक वास्तव्य करत आहेत.कोण होणार करोडपती या मालिकेतून ते घराघरात पोहोचले.त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.पुरस्कारानंतर कमला कॉलेजचे प्रा.डॉ.सुजय पाटील श्री.सचिन खेडेकर यांची प्रकट मुलाखत घेतील अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक जयश्री दानवे,राजदर्शन दानवे, सुधीर पेटकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments