शिवसेना शाखा संयुक्त उत्तरेश्वर पेठ ते शुक्रवार पेठ यांच्या व जनरल प्रँक्टिशनर असोसिएशनतर्फे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
कोल्हापूर/प्रतिनिधी : स्वग्रीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा संयुक्त उत्तरेश्वर पेठ ते शुक्रवार पेठ यांच्या व जनरल प्रँक्टिशनर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, डॉ शिवराज देसाई यांच्या सहकार्याने रोजी सकाळी अकरा वाजता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. सातशे रूग्णांनी त्याचा लाभ घेतला. शिवसेना शाखा प्रमुख श्री रियाज बागवान यांनी शिबिराचे उत्कृष्ट नियोजन केले होते. त्या ठिकाणी जीपीएच्या अध्यक्षा डॉ उषा निंबाळकर, सचिव डॉ महादेव जोगदंडे, डॉ उद्यम व्होरा, डॉ शिवराज जीतकर, डॉ शिवराज देसाई व डॉ सुनिता देसाई ,या सर्वांनी सेवेचे योगदान दिले.