भाजपा युवा मोर्चा, महिला मोर्चाच्यावतीने नाना पटोले यांना जोडे-मारो आंदोलन नाना पटोले यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध
कोल्हापूर /प्रतिनिधी : महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेताल व खासगी आयुष्यावर आक्षेपार्ह विधान करून त्या पदाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाना पटोले यांच्या प्रतिमेला जोडे-मारो आंदोलन करण्यात आले.
युवा मोर्चाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तर महिला मोर्चाच्यावतीने बिंदू चौक येथे स्वतंत्र कार्यक्रम घेत तीव्र निषेध नोंदवला. “नाना पटोले कोण रे त्याला जोडे मारा दोन रे”, “नाना पटोलेच करायचं काय खाली डोक वर पाय”, “निम का पत्ता कडवा है, नाना पटोले भडवा है” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
“महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रथम क्रमांकावर राहिली व राष्ट्रीय कोंग्रेस पार्टी चौथ्या क्रमांकावर फेकली गेल्याने वैफल्य ग्रस्त झालेले कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष स्वतःचे अपयश लपवण्याच्या हेतूने रविवारी पुन्हा एकदा देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्यावर बेताल व खासगी आयुष्यावर आक्षेपाहार्य विधान करून खोटी प्रसिद्धी मिळविण्याचा व पार्टी हाय कमांडचा विश्वास मिळवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला. कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जर नाना पटोले कोल्हापुरात येण्याचे धाडस करतील तेव्हा भारतीय जनता युवा मोर्चाकडून त्यांचे कोल्हापुरी चप्पलानेच स्वागत करण्यात येईल. तसेच जोपर्यंत नाना पटोले यांना पोलिस प्रशासन अटक करत नाही व कोंग्रेस पार्टी चे हाय कमांड त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करत नाहीत तो पर्यंत भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे उग्र आंदोलने चालूच राहतील” असा इशारा जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांनी केला.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस हेमंत आराध्ये म्हणाले “ कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गेल्या ३ दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल असंवेदनिक भाषेमध्ये ज्या पद्धतीने टीका चालू केली आहे याचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो तसेच जगामध्ये लोकप्रिय असणार्या व्यक्तीबद्दल अतिशय चुकीच्या पद्धतीने बोलून स्वतःचे महत्व वाढवण्याऐवजी त्यांनी स्वतःचे कर्तुत्व काय आहे याचा शोध घ्यावा. पंतप्रधान मोदीजींवर टीका करण्यापेक्षा मागील सव्वादोन वर्षे बाहेर न पडलेल्या मा. मुख्यमंत्र्यांना बंगल्या बाहेर पडावे या साठी त्यांनी आंदोलन करावे.”
तसेच याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस विवेक वोरा यांनी “काँग्रेसचे वाचाळवीर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा मोदीँ बद्दल पुन्हा एकदा गरळ ओकत आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. नाना पटोले यांना स्वतःच्या जिल्ह्यात एक नगरपंचायत जागा निवडून आणता येत नाही आणि आपल्यापेक्षा कर्तुत्वाने, वयाने सर्वार्थ वडीलधारे असणाऱ्या देशाच्या पंतप्रधान मोदीजी यांच्या बद्दल वायफळ बडबड करून स्वत:ला चर्चेत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी बोलताना महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गायत्री राउत म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान, भारत देशाचे नेतृत्व म्हणून संपूर्ण जगामध्ये ज्यांना आदराने पाहिले जाते अशा मा.नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून स्वत:ला राजकीय जीवनात मोठे स्थान आणू पाहणाऱ्या कर्तव्यशून्य नाना पटोले यांचे हे वर्तन अशोभनीय आहे. नाना पटोले यांनी दारुड्या सारखे जे वक्तव्य केले त्यामध्ये त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना जर राष्ट्राबद्दल प्रेम असेल, पंतप्रधान पदा बद्दल त्यांच्या बद्दल त्याच्या मनात आदर असेल तर त्यांनी नाना पटोले यांना ताबडतोब अटक करावी अन्यथा आगामी काळातील कोल्हापूर दौऱ्यामध्ये त्यांना कोल्हापुरी हिसका दाखवल्या शिवाय गप्प बसणार नाही असा इशारा दिला.
या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मैत्राणी, हेमंत आराध्ये, पक्ष प्रवक्ते अजित ठाणेकर, भरत काळे, माजी नगरसेवक प्रदीप उलपे, माजी नगरसेवक चंद्रकांत गाडगे, युवा मोर्चा प्रदेश सदस्य विराज चिखलीकर, गिरीश साळोखे, सुनील पाटील, रोहित कारंडे, प्रसाद घाटगे, अनिकेत मुतगी, प्रसाद पाटोळे, सुषमा गर्दे, भारती जोशी, सुलभा मुजुमदार, आसावरी जुगदार, पक्षातील इतर कार्यकर्ते उपस्थित होते