Sunday, July 14, 2024
Home ताज्या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास यश गांधीनगर सह...

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास यश गांधीनगर सह इतर गावातील नळ पाणी पुरवठा योजनेस रु.१३७ कोटींच्या निधीची मंजुरी

गांधीनगर सह इतर गावातील नळ पाणी पुरवठा योजनेस रु.१३७ कोटींच्या निधीची मंजुरी

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास यश

कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर शहराला लागून असलेल्या गांधीनगर, उचगाव, मुडशिंगी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नेर्ली तामगाव, वळीवडे, कणेरी, कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, पाचगाव, मोरेवाडी या गावांत नागरीकरण वाढले आहे. शहराचा विस्तार मर्यादित राहिल्याने या गावातील नागरीकरणावर भर पडत आहे. सद्या या गावांतील एकत्रित संख्या सुमारे २ लाखांच्या आसपास गेल्याने मुलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यातच गांधीनगर सह करवीर तालुक्यातील गावांचा पाणी प्रश्न गेली अनेक वर्षे गंभीर बनला आहे. हा प्रश्न मार्गी लावावा यासाठी गेली अनेक वर्षे सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरु असून, याबाबत गेल्याच महिन्यात पाणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नाम.श्री.गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्यास यश आले असून, गांधीनगर सह करवीर तालुक्यातील इतर गावातील नळ पाणी पुरवठा योजनेस राज्य शासनाकडून प्रशासकीय मान्यता देत रु.१३७ कोटी २१ लाख इतक्या निधीस मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. याबाबत माहिती देताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर शहराच्या वाढत्या नागरीकरणाचा परिणाम शहराशेजारील गावांवरही पडला आहे. त्यामुळे या गावातील नागरी मुलभूत सोयी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. अशातच मौजे गांधीनगर व इतर गावे याकरिता प्रस्तावित प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे प्रलंबित होता. याबाबत सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरु होता. याबाबत गेल्या महिन्यात पाणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नाम.श्री.गुलाबराव पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून या पाणी प्रश्नाची दाहकता मांडली होती. याबाबत पाणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नाम.श्री.गुलाबराव पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती.
आज पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत मौजे गांधीनगर व इतर गावे (ता.करवीर, जि.कोल्हापूर) या नळ पाणी पुरवठा योजनेस पाणी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, निधी मंजुरीचा शासन आदेश पारित करण्यात आला आहे. या अनुषंगाने मौजे गांधीनगर व इतर गावे येथील ५५ लिटर दरदोई दरदिवशी क्षमतेच्या रु.१७६५ इतका दरडोई खर्च असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या रु.१३७२१.१५ लक्ष इतक्या ढोबळ किमतीच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.या निधी मंजुरीमुळे गेली अनेक वर्षे गांधीनगर सह इतर गावांना भेडसावणाऱ्या पाण्याचा प्रश्न निकाली लागला असून, *या निधी मंजुरी कामी सकारात्मक निर्णय घेणारे राज्याचे मुख्यमंत्री नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब, पर्यावरण मंत्री नाम.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब आणि पाणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नाम.श्री.गुलाबराव पाटील यांचे गांधीनगर सह इतर गावातील ग्रामस्थांच्या कडून आभार मानत असल्याचेही, श्री.राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments