अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला १० वर्षे सक्तमजुरी व ५० हजार दंडाची शिक्षा
कोल्हापूर /प्रतिनिधी : पेरूचे आमिष दाखवून अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी १० वर्ष सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.या दंडातील ४० हजार रुपयाची रक्कम ही पीडित मुलीला देण्याचे आदेशही दिले आहेत.कोल्हापुरात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरी कोणी नसल्याची संधी साधून ओंकार उर्फ बंड्या उर्फ भूकंप आनंदा दाभाडे (वय २३ रा. कोल्हापूर) याने तुला पेरूसाठी पाच रुपये देतो असे सांगून सकाळी ९.३० वाजता घरी कोणी नसल्याचे पाहून या शाळकरी मुलीवर अत्याचार केले होते.यानंतर आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या या आवळल्या होत्या.आज याचा निकाल लागला.याकामी सरकारी वकील म्हणून अँड. मंजुषा पाटील यांनी काम पाहिले.
याबाबतची माहिती अशी पीडित मुलगी व आरोपी ओंकार एकमेकांच्या परिचयाचे असून त्यांचे एकमेकांच्या घरी येणे – जाणे होते. तर पीडित मुलगी वडील वारल्याने आपल्या आजीसोबत रहाते. दरम्यान १५ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी पीडितेची आजी कामाला गेल्या होत्या तर शाळेला सुठ्ठी असल्याने मुलगी घरी होती. यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधून पीडितेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन आरोपी ओंकार उर्फ बंड्या दाभाडे याने तिच्यावर अत्याचार केला होता.आजी घरी आल्यानंतर त्याच्या निदर्शनास हे आल्यानंतर आजीने पीडित मुलीच्या आजीने शाहूपुरी पोलिसात याबाबत तकार दाखल केली होती. याचा सहायक पोलिस निरीक्षक अनिता मेनकर यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. दरम्यान आज सोमवारी जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपी ओंकार दाभाडे याला १० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा आज सुनावण्यात आली.