कोल्हापूर सराफ व्यापारी संघामध्ये रविवारी पदाधिकारी आणि संचालकांनी मुंबईमध्ये मार्चमध्ये होणाऱ्या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याचे केले आवाहन अधिकाधिक सराफ व्यावसायिकांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा – भरत ओसवाल
कोल्हापूर/प्रतिनिधी : जीजेसीच्या वतीने १ ते ४ मार्चला आयोजित प्रदर्शनाचा अधिकाधिक सराफ व्यावसायिकांनी भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांनी केले.जीजेसीच्या वतीने मुंबई येथील जिओ कन्व्हेशन सेंटर येथील हमारा अपना शोचे आयोजन केले आहे. त्याच्या नोंदणीसाठी आज येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या कार्यालयात सुरवात झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
ते म्हणाले, ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलच्या वतीने इंडिया जेम अँड ज्वेलरी शोचे आयोजन केले आहे. बीकेसी येथे आयोजित या प्रदर्शनात यामध्ये १२५० स्टॉल आहेत. त्यामध्ये सोने, चांदी, हिरे, रत्न याचबरोबर मशीनरीचेही स्टॉल असणार आहेत. चार दिवसांच्या या प्रदर्शनात चारही दिवस सकाळाचा नाष्टा आणि दुपारचे जेवण मोफत असणार आहे. याचवेळी या क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शनही होईल.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच होणाऱ्या या प्रदर्शनाला भेट देऊन व्यवसायाच्या वृद्धीसाठी ही मोठी संधी आहे, त्याचा लाभ घ्यावा. सराफ व्यावसायिकांबरोबर सोने-चांदी कारागिरांनाही याचा लाभ घ्यावा. नोंदणीसाठी जीजेसीची टीम सराफ व्यापारी संघाच्या कार्यालयात दोन दिवस थांबणार असून लवकरात लवकर नोंदणी करावी.यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, शहर व जिल्ह्याचे संचालक अशोक झाड, माणिक जैन, राजू चोपडे, संजय चोडणकर, तुकाराम माने, सुहास जाधव, प्रसाद कालेकर, तेजस धडाम, किशोर परमार, प्रीतम ओसवाल, विजयकुमार भोसले, जीजेसीचे प्रतिनिधी निनाद मुंढे, आशीष चौकेकर आदी उपस्थित होते.