ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांचे पार्थिव दर्शनासाठी कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या प्रांगणात दाखल
कोल्हापूर/प्रतिनिधी : ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांचे पार्थिव कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या प्रांगणात अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले असून त्यांच्या पत्नी श्रीमती सरोज पाटील उर्फ माई, तसेच ग्रामविकास मंत्री हसनसाहेब मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर दाखल झाले आहेत.दुपारी १ वाजेपर्यंत त्यांचे दर्शन लोकांना घेता येणार आहे कोरोनाचे सर्व नियम पाळत त्यांच्यावर मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अत्यसंस्कार केले जाणार आहेत.