Sunday, July 14, 2024
Home ताज्या भुकेलेल्यांना पोटभर दोन वेळेचे जेवण मिळणार मोफत भारतीय जन संविधान मंच व...

भुकेलेल्यांना पोटभर दोन वेळेचे जेवण मिळणार मोफत भारतीय जन संविधान मंच व चांगुलपणाची चळवळद्वारे उपक्रम

भुकेलेल्यांना पोटभर दोन वेळेचे जेवण मिळणार मोफत
भारतीय जन संविधान मंच व चांगुलपणाची चळवळद्वारे उपक्रम

कोल्हापूर/ प्रतिनिधी : शहरातील विविध स्वयंसेवी संस्था तसेच संघटनांनी शुक्रवारपासून राजर्षी शाहू महाराज भूकमुक्त कोल्हापुर ही संकल्पना राबविण्याचा निर्धार केला असून भुकेल्यांना पोटभर दोन वेळचे जेवण या संकल्पनेच्या माध्यमातून मोफत देण्यात येणार आहे अशी माहिती बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
भारतीय जन संविधान मंचतर्फे ही संकल्पना राबविण्यात येणार आहे या उपक्रमात शहरातील अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती सहभागी होत आहेत शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून या उपक्रमाची सुरुवात उद्या शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता शाहू स्टेडियम येथील मंचच्या कार्यालयापासून होणार आहे.शाहू महाराज छत्रपती यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात ही होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.                                                               कोल्हापूर शहरात कोणीही भिकारी, फिरस्ता वेडसर व्यक्ती अन्नाशिवाय उपाशी राहू नये त्यांना दोन वेळचे पोटभर अन्न मिळावे अशी ही संकल्पना राबविणे मागची भूमिका आहे रोज साधारण ६०० ते १००० भुकेल्या व्यक्तींना चपाती किंवा भाकरी, भाजी,भात व खिचडी असे अन्न दिले जाणार आहे. उजळाईवाडी,जेम्सटोन,रिलायन्स मॉल पिछाडी, शाहू टोल नाका येथे असलेल्या महानगरपालिकेचा निवारा केंद्रातही सकाळी संध्याकाळी जेवण पुरविले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत शहा,मदन भंडारी आणि प्रताप कोंडेकर यांनी चक्क ७० दिवसात कोल्हापूर ते लंडन केला २० देशांचा थरारक प्रवास

सेव्ह वॉटर सेव्ह नेचर.... या 'कोल्हापूर ते लंडन' या जनजागृती संदेश यात्रेच्या माध्यमातून कोल्हापूरच्या चार मित्रांनी कोल्हापूरचे नाव कोरले लंडनच्या हृदयावर कोल्हापूरमधील प्रसिद्ध व्यावसायिक हेमंत...

कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी रोजगार उपलब्धीसह विधायक ओळख – व्यवस्थापकीय संचालक तुषार शेळके

जगप्रसिद्ध ब्रीक्स्टन मोटरसायकल्स आणि व्ही एल एफ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स भारतात संयुक्त निर्मिती सह वितरीत करण्यासाठी केएस डब्ल्यू वेलोसे मोटर्स सज्ज कोल्हापूरच्या उघोग विश्वाची होणार नवी...

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षपदी सौ. अरूंधती महाडिक तर उपाध्यक्षपदी मिरा कुलकर्णी यांची निवड कोल्हापूर/प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षपदी सौ....

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत

नेहरूनगर येथील दत्त भक्त मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत केली मिरजकर तिकटी येथील अंधशाळेस आर्थिक मदत कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातील श्री दत्त मंदीर...

Recent Comments