कोरोनाचा धोका वाढला लोकांसमोर आव्हान
कोल्हापूर/श्रद्धा जोगळेकर : कोरोनाचा धोका आणखी एकदा वाढत चालला असून दिवसेंदिवस मुंबई आणि पुण्यामध्ये ही आकडेवारी वाढतच चालली आहे यामध्ये मुंबईमध्ये आकडेवारी संख्या मोठी आहे पश्चिम बंगाल हरियाणा या ठिकाणी लॉकडाऊन केले गेले आहे शाळा कॉलेज महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत आणि कडकडीत निर्बंध लादले गेले आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये ही कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत चालली आहे मात्र आरोग्यमंत्र्यांनी कोणत्याही पद्धतीचे लॉकडाऊन केले जाणार नाही मात्र निर्बंध हे केले जातील असे आव्हान केले आहे त्यामुळे आता लॉकडाऊन ऐवजी कोरोनाच्या विळख्यातून कसे सामोरे जायचे याचे लोकांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे लोकांना गांभीर्याने घेणे आवश्यक झालेले आहे कारण गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनाचा उद्रेक इतका झाला आहे की त्यावेळी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने बंद केले होते लॉकडाऊन पुकारले होते. आता मात्र तशी परिस्थिती नाही लॉकडाऊन केले जाणार नाही असे सूचित केले गेले आहे मात्र कडक निर्बंध लादले जाणार आहेत आता कोरोना घरामध्ये आला आहे यात सतर्कता बाळगणे लोकांनीच आवश्यक झालेले आहे कारण मागील दोन वर्षे कशी गेलीत आणि आता येणारी तिसरी लाट हो लोकांसमोर मोठे आव्हान असणार आहे कारण गेल्या दोन वर्षांमध्ये जेव्हा लॉकडाऊन केले गेले त्यावेळी लोकांना एकमेकांच्या घरी जाता येत नव्हते नातेवाइकांना भेटता येत नव्हते अशी परिस्थिती होती त्यामुळे लोक सुरक्षित होते आता मात्र परिस्थिती तशी परिस्थिती राहिली नसून लोक आता गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घेऊन सतर्क राहणे आवश्यक झालेले आहे आणि कोरोनाची तिसरी लाटही लोकांसमोर पुन्हा एकदा आव्हानात्मक निर्माण झालेली असून या आव्हानाला आता लोकांना सामोरे जावे लागणार आहे कारण जर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने जर लॉकडाऊन नाही तरी जे काही पुकारले नाही कडक निर्बंध लादतील त्याचे पालन करणे हे लोकांनी आवश्यक झालेले आहे आणि जर हे पालन नाही केले गेले तर मात्र लोक या कोरोनाच्या विळख्यात सापडतील आणि भयावह परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही आधीच जागतिक आरोग्य संघटनेने मोठ्या प्रमाणात मृत्यूची संख्या वाढली जाणार आहे असेही घोषित केले आहे त्यामुळे लोकांनी आता मास्क लावणे,सॅनिटायझर वापरणे आणि सोशल डिस्टंसिंग ठेवणे हे गरजेचे असून लोकांनी स्वतःला वाचविण्यासाठी स्वतः नियम जाणून घेणे आवश्यक आहे त्यामुळे ही कोरोनाची तिसरी लाट लोकांसमोर मोठी आव्हानात्मक असून हे आव्हान लोकांनीच आता पेलणे आवश्यक आहे.