‘गोकुळ’ च्या महालक्ष्मी पशुखाद्यास बी.आय.एस. प्रमाणपत्र प्राप्त – चेअरमन विश्वास पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा संघाच्या श्री महालक्ष्मी पशुखाद्याच्या सन २०२२ या नव्या वर्षात भारत सरकारने फूड सेफ्टी अॅक्ट(FSSAI) नुसार पशुखाद्याच्या उत्पादन व विक्रीसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस (BIS) प्रमाणपत्र CFIG.NO-CM/L7500231914 प्राप्त करण्यास गोकुळला यश मिळाले असून इथून पुढील काळात (BIS) मानाकंन स्टँडर्डप्रमाने पशुखाद्याचे उत्पादन करून जिल्ह्यातील असंख्य दूध उत्पादकांना अधिक गुणवत्तापुर्ण पशुखाद्य उपलब्ध करून देणार असल्याचे माहिती संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.
पुढे बोलताना श्री. पाटील म्हणाले कि संघाच्या गडमुडशिंगी व कागल पंचतारांकीत एम.आय.डी.सी.या दोन ठिकाणी महालक्ष्मी पशुखाद्य उत्पादित केले जाते. संघाने नेहमीच गुणवत्तेला प्राधान्य दिले असुन याकरीताच गोकुळने अग्रक्रमाने BIS मानांकन प्रमाणपत्र घेणेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून BIS चे प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे. भारत सरकारच्या अन्न व औषध प्रणाली प्रमाने दूध व दुग्धजन्य पदार्थांना बी.आय.एस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक होते. परंतु पशुखाद्याच्या उत्पादन व विक्रीसाठी अशा कोणतेही प्रकारचे बंधन केंद्रशासनाने यापूर्वी केले नव्हते. गाई- म्हैशीना आरोग्यदायी व गुणवत्तापूर्ण असे पशुखाद्य मिळावे यासाठी (FSSAI) यांनी पशुखाद्य उत्पादन व विक्रीसाठी (BIS) प्रमाणपत्र घेणे आवश्यक असलेचे FSSAI ने निर्देश दिले होते. त्यानुसार केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून संघाने (BIS) चे मानाकंन प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे. दर्जेदार गुणवत्तेचे पशुखाद्य गोकुळच्या दूध उत्पादकांच्या गाई व म्हैशींसाठी उपलब्ध केले जाईल. याचा दूध वाढीसाठी नक्कीच याचा फायदा होणार आहे. तसेच माहे डिसेंबर २०२१ मध्ये १३,०००मे. टन इतकी विक्रमी पशुखाद्याची विक्री झाली असून जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादकांचा संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्यावरील विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला आहे. याकरिता संघाचे सर्व दूध उत्पादक, दूध संस्था, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक, अधिकारी व कर्मचारी यांचे श्रेय आहे.