करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी नवीन वर्षात भाविकांची गर्दी
कोल्हापूर/प्रतिनिधी : नूतन वर्ष २०२२ सुरू झाले आहे या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज १ जानेवारी रोजी कोल्हापूर मधील करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती बाहेरून येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेतून ई पास पाहूनच सोडण्यात येत होते मंदिर आवारातील देवी तुळजाभवानीच्या मंदिरातही दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती यावेळी कोरोनाचे संकट दूर होऊ दे असे देवीकडे बऱ्याच भाविकांनी प्रार्थना केली.