वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीवर सत्ताधार्यांचे वर्चस्व
पेठवडगाव /प्रतिनिधी : वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची आज बुधवारी मतमोजणी झाली. या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षि शाहू शेतकरी विकास आघाडीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व अबाधित ठेवत विजय प्राप्त केला आहे.महाडिक, कोरे, आवाडे, मिणचेकर, शेट्टी पॅनेलचे १८ उमेदवार विजयी झाले आहेत.
सत्ताधारी आघाडीने विरोधी महाविकास आघाडीवर सर्वच जागांवर निर्विवाद विजय मिळवला आहे.
विजयी निकालानंतर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष केला. तर शिरोली पंपावर जल्लोष करत माजी आ. महादेवराव महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा दिल्या.
विजयी उमेदवारांमध्ये
किरण जयसिंगराव इंगवले, विलास बाबासो खानविलकर, आण्णासो बंडू डिग्रजे, जगोंडा लक्ष्मण पाटील, शिवाजी पांडुरंग पाटील, सुरेश तात्यासो पाटील, बाळकृष्ण गणपती बोराडे, भारती रावसो चौगुले, वैशाली राजेंद्र नरंदेकर, सुनिता मनोहर चव्हाण, चाँद बाबालाल मुजावर, धुळगोंडा आण्णासो डावरे, राजू उर्फ अभयकुमार आप्पासो मगदूम, नितीन पांडुरंग कांबळे, वसंतराव शामराव खोत, सागर सुनिल मुसळे, नितीन विष्णू चव्हाण, संजय बाबुराव वठारे आदींचा समावेश आहे.