Thursday, December 5, 2024
Home ताज्या कोल्हापूर काँग्रेसचे उत्तरचे आम उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे हैद्राबाद येथे निधन

कोल्हापूर काँग्रेसचे उत्तरचे आम उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे हैद्राबाद येथे निधन

कोल्हापूर काँग्रेसचे उत्तरचे आम उद्योजक खेळाडू चंद्रकांत जाधव यांचे हैद्राबाद येथे निधन

कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार उद्योजक फुटबॉलपटू चंद्रकांत जाधव यांचे आज गुरुवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार सुरु होते.त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती ती यशस्वी न झाल्याने आज गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे निकटवर्तीय यांनी सांगितले आहे.
दुपारी एक पर्यंत त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येणार आहे. उद्योजक आम.जाधव  यांचा कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळाशी फुटबॉललच्या माध्यमातून थेट संपर्क होता. त्याबरोबरच राजकीय व सामाजिक कार्यातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता. उद्योजक जाधव यांच्या निधनाबद्दल सकाळी सोशल मीडियावर समजताच कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता. त्यांनी उद्योजक म्हणून तर अनेकांना रोजगार दिले होते.कोल्हापूर शहरात त्यांनी अनेक विकासकामे हाती घेतली होती.कोल्हापूरमधून एक चांगला माणूस निघून गेल्याने कोल्हापूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर

रविवारी गडहिंग्लज येथे मोफत ह्रदयरोग व वंध्यत्वनिवारण तपसणी शिबीर कणेरी/प्रतिनिधी : सिद्धगिरी हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ, यांच्या मार्फत रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४...

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या रणजीतला सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरण पुरस्कार कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा विद्यार्थी रणजीत सी. पी यांना सर्वोत्कृष्ट पोस्टर सादरीकरणासाठी असोसिएशन...

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान

कोल्हापूर  जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सायंकाळी 5 पर्यंत सरासरी 67.97 टक्के मतदान 273 कागल मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 74.33 टक्के मतदान कोल्हापूर/प्रतिनिधी  : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024...

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ पर्यंत सरासरी ५४.०६ टक्के मतदान

कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी १ पर्यंत सरासरी ३८.५६ टक्के मतदान करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी ४५.२९ टक्के मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात दुपारी...

Recent Comments