तीन हजार रूपयाची लाच स्विकारताना हातकणंगले ग्रामीण रूग्णालयाचा कनिष्ठ लिपीक सूधीर र्चोधरी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
कोल्हापूर/प्रतिनिधी : तक्रारदार यांच्या विवाहाची नोंदणी करून दाखला देण्याकरिता सूधीर अमितचंद र्चोधरी वय ४५ पद कनिष्ठ लिपिक हातकणंगले ग्रामीण रूग्णालय वर्ग ३ रा. रूक्मिणी र्होसिंग सोसायटी प्लाॅट नं १२ संजय नगर सांगली व खासगी इसम सचीन शिवाजी भोसले रा. नेज. ता. हातकणंगले याने ३००० रूपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम आज स्विकारताना खासगी इसम र्सोरभ अरविंद नर्ले वय २४ रा. नेज याला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकङले.ही कारवाई पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बूधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पो .ना. विकास माने पो. हे. काँ संजीव बंबरगेकर पो ना रूपेश माने” चालक सूरज अपराद यांनी केली.