Thursday, July 18, 2024
Home ताज्या येत्या ३ डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार ‘पिरेम’

येत्या ३ डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार ‘पिरेम’

येत्या ३ डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार ‘पिरेम’

कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या दीडेक वर्षांपासून कोरोना महामारीमुळे निष्प्रभ झालेली चित्रपटसृष्टी पुन्हा उभारी घेऊ पाहतेय. लॉकडाऊन मध्ये आणि नंतरही बंद ठेवण्यात आलेली सिनेमागृहे आता सुरु झाली असून हिंदी सोबत मराठी चित्रपटही प्रदर्शनासाठी तयारी करताहेत. पर्व फिल्म्स निर्मित ‘पिरेम’ हा मराठी सिनेमादेखील येत्या ३ डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
‘पिरेम’ ह्या नावावरून कल्पना आलीच असेल की कथा ग्रामीण भागातील आहे. ही कहाणी एका गावातील गरीब घरातील अत्यंत हुशार मुलाची आहे, जो गावात उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे दहावीनंतर शहरातील कॉलेजात शिकायला जातो. तिथे त्याच्या आयुष्यात प्रेमांकुर फुलतो परंतु तो एका विचित्र प्रसंगात गुरफटून जातो. पर्व फिल्म्स निर्मित ‘पिरेम’ या चित्रपटातून विश्वजीत पाटील आणि दिव्या सुभाष ही एक नवीनतम जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांच्यासोबत मानिनी दुर्गे, विठ्ठल खलसे, सागर खुर्द यांसारखी तगडी कलाकार मंडळी सोबतीला आहेत.
जगात कुठेही गेलात तरी प्रेम ही भावना सारखीच दिसून येईल. जात, भाषा, वर्ण, धर्म, गरीब, श्रीमंत, शहर वा गाव अशा कुठल्याही गोष्टी प्रेमामध्ये अडसर ठरत नाहीत. खऱ्या प्रेमामध्ये स्वार्थाला तसूभरही जागा नसते व दोन्ही व्यक्ती समोरच्याला अधिकाधिक आनंद मिळावा यासाठी प्रयत्शील असतात. प्रदीप लायकर दिग्दर्शित ‘पिरेम’ या मराठी चित्रपटात याच भावनेला अतिशय वेगळ्या ढंगाने पेश केलं आहे. एक निस्वार्थी ग्रामीण प्रेमकथा असलेला चित्रपट ‘पिरेम’ ३ डिसेंबर २०२१ ला संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments