Friday, July 19, 2024
Home ताज्या सिबीक इन्स्टिट्यूटला महाराष्ट्र शासनाची मान्यता, ८ डिसेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन

सिबीक इन्स्टिट्यूटला महाराष्ट्र शासनाची मान्यता, ८ डिसेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन

सिबीक इन्स्टिट्यूटला महाराष्ट्र शासनाची मान्यता, ८ डिसेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन

कोल्हापूर/प्रतिनिधी : भारतातील पहिली इन्क्युबेटेड सह स्टार्टअप इको सिस्टीम असणारी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ(MSBTE) संलग्नित व्यवसायाभिमुख पदविका संस्थेस कोल्हापूरमध्ये प्रथमच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून प्रवेशाकरिता महाराष्ट्र शासनाकडून अंतिम मान्यता प्राप्त झाली आहे अशी माहिती संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी दिली आहे.सिद्धम इनोव्हेशन व बिझनेस इन्क्युबेशन सेंटर संचलित सिबीक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर ही महाराष्ट्र राज्यतंत्रशिक्षण मंडळ मुंबई संलग्नित व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त ६ महिन्यांच्या इंटर्नशिपसह १ वर्षांच्या कालावधीचे १२ वी पास विद्यार्थ्यांकरिता डिप्लोमा इन सप्लायचेन मॅनेजमेंट व लॉजिस्टिक तसेच १२ वी, आयटीआय, डिप्लोमा इंजीनियरिंगच्या विद्यार्थ्यांकरीता डिप्लोमा इन मेडिकल इक्विपमेंट मेंटेनन्स व ॲडव्हान्सड डिप्लोमा इन इंटरनेट ऑफ थिंग्स तसेच बी.एस.सी, बी.फार्म, बी.ए, एम. एस,बी.एच.एम. एस, विद्यार्थ्यांकरिता आरोग्य विभागाशी निगडित ॲडव्हान्सड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हे व्यवसायाभिमुख प्रत्येकी ६० जागेसह वार्षिक फी रुपये २५ हजार ते ३० हजार प्रमाणे प्रथमच उपलब्ध झाले आहेत.                                    मागील दोन्ही वर्ष कोरोना महामारीमुळे बारावी, डिप्लोमा, ग्रॅज्युएटसह सर्व व्यवसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने झाल्याने त्यांना कौशल्य अवगत करण्यासाठी या अल्प मुदतीच्या कोर्सेसमुळे चांगली नोकरी अथवा व्यवसाय चालू करण्यास मदत होणार आहे यासाठी कव्वालीटास कंपनीच्या संयुक्त विद्यमानेI oT साठी आद्यवत एक्सलेन्स सेंटर,आरोग्याशी निगडित कोर्सेससाठी अद्ययावत डायग्नोस्टिक सेंटर तर सर्व इंडस्ट्री साठी ४.० साठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर प्रणाली, डिजिटल क्लासरूम व इंटरनेटसह कॉम्प्युटर सेंटरची उभारणी केली गेली आहे.कोरोना महामारीमुळे ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा विद्यार्थ्यांना या संघटनेत ३५ स्टार्टअपमध्ये कमवा व शिका या तत्वावर तासिका बेसिसवर काम उपलब्ध करू दिले जाणार आहे जेणेकरून असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही या कोर्सच्या इंटरंशिप करिता IBM,Flipkart,Amazon,CISCO,BOSCH,MEDALL सह २० स्किल नॉलेज प्रोव्हायडर (SKP) शी सामंजस्य करार केला आहे. ज्याअंतर्गत विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाणार आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी संस्थेशी प्रवेशासाठी ८ डिसेंबर २०२१ पर्यंत संस्थेच्या कैलास टॉवर न्यू शाहूपुरी येथे संपर्क साधावा असे आवाहन संचालक डॉ. संजय दाभोळे यांनी केले आहे यावेळी पारस ओसवाल, रमेश कार्वेकर, सचिन कुंभोजे, सूर्यकांत दोडमिसे व प्रतिक ओसवाल सह प्राचार्य रवींद्र वाघ सर्व संचालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड

घोडावत विद्यापीठतील फार्मसी विभागाच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड किमया शिंदे व अरिहंत परमाज यांना साडेपाच लाखाचे पॅकेज अतिग्रे/प्रतिनिधी :संजय घोडावत विद्यापीठाने शिक्षण क्ष्रेत्रात अल्पावधीतच आपले नाव...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये डॉ. सुहास देशमुख यांचे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांतर्गत डॉ. सुहास देशमुख, संचालक, राष्ट्रीय...

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण

हेल्थ इन्श्युरन्स संकल्पनांचे स्पष्टीकरण श्री. भास्कर नेरुरकर हेड - हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीम, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स. तांत्रिक डोमेन आणि कायदेशीर करार असल्यामुळे बहुतांश इन्श्युरन्स संकल्पना या...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सीपीआर भूमिपूजन व जिल्हा बँक नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी कोल्हापुरात येणार जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होणार कार्यक्रम,दहा हजार वृक्ष लावण्याची...

Recent Comments