Saturday, November 2, 2024
Home ताज्या श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांना गोकुळ परिवाराकडून अभिवादन

श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांना गोकुळ परिवाराकडून अभिवादन

श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांना गोकुळ परिवाराकडून अभिवादन

कोल्हापूर/प्रतिनिधी : श्वेतक्रांतीचे जनक स्व.डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जन्‍मशताब्‍दी निमित्‍त  गोकुळतर्फे अभिवादन करण्यात आले व हा दिवस राष्‍ट्रीय दुग्ध दिन म्‍हणून साजरा केला जातो. गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्या हस्ते डॉ. वर्गीस कुरियन यांच्‍या प्रतिमेचे पूजन करून त्यांना जिल्ह्यातील दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी मुंबई येथे झालेल्‍या २६/११/२००८ च्‍या दहशतवादी हल्‍यातील वीरमरण पावलेल्‍या शुर विरांना यांनाही गोकुळ परिवाराकडून आदरांजली वाहण्‍यात आली,
यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील म्‍हणाले श्वेत क्रांतीचे जनक आणि डॉ. वर्गीस कुरियन यांची  १००  वी जयंती आहे.  तसेच २०१४   पासून हा दिवस राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून ही साजरा केला जातो. डॉ. कुरियन यांना श्रद्धांजली म्हणून आणि त्यांचे कार्य आणि त्यांच्या जीवनपद्धतीचे स्मरण म्हणून विविध कार्यक्रमाचे  त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा एक भाग म्हणून देशभरात सायकल रॅली, वॉकथॉन, चे आयोजन केले गेले आहे. २६ नोव्हेंबर २०२१ हा दिवस, देशातील डेअरी सहकारी संरचनेच्या विकासात डॉ. वर्गीस कुरियन यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन कृतज्ञता आणि प्रामाणिक कौतुक व्यक्त करण्यासाठी आपण हा कार्यक्रम घेत आहोत. त्यानुसार, नेहमीच सहकारातील संस्था मजबुतीकरणावर भर दिला. कारण संस्थेचा आर्थिक पाया भक्कम असल्याशिवाय दूध उत्पादकांना जास्तीत जास्त लाभ करून देता येणे शक्य नाही याकरिता त्यांनी नेहमीच गोकुळसारख्या संस्थांना मार्गदर्शन केले. त्यांच्या विचाराने चाललेल्या गोकुळची आर्थिक परिस्थिती नेहमीच भक्कम राहिलेली आहे. डॉ.कुरियन यांचा ग्रामीण दूध उत्पादक शेतकऱ्यांवर प्रचंड विश्वास होता. दूध उत्पादक शेतकरी कधीही कर्ज बुडवणारा नाही याची त्यांना खात्री होती म्हणूनच त्यांनी सहकारी संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भावना ठेवली. त्यामुळेच गोकुळसारखा संघ आज यामध्ये आघाडीवर आहे.असे मनोगत व्‍यक्‍त केले.
यावेळी  स्वागत व प्रास्ताविक संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी केले. संघाचे माजी चेअरमन अरूण डोंगळे यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. तर आभार संचालक बाबासाहेब चौगले यांनी मानले.यावेळी गोकुळचे चेअरमन,विश्‍वास पाटील, माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अजित नरके,नंदकुमार ढेगे, बाबासाहेब चौगले,प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी श्री.एस.एम.पाटील, डेअरी व्‍यवस्‍थापक अनिल चौधरी, व्यवस्थापक प्रशासन श्री.डी.के.पाटील, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा

डी. वाय पाटील यांच्या वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव ९० वा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे...

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना ‘वेल्डींग, सीएनसी कोर्स’ व ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या’ प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

स्मॅक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कोल्हापूर जिल्हयातील मुलींना व युवकांना 'वेल्डींग, सीएनसी कोर्स' व 'अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या' प्रशिक्षणाची सुवर्णसंधी शिरोली एमआयडीसी/प्रतिनिधी : केंद्रशासना मार्फत व्यावसायिक प्रशिक्षणाच्या संधी...

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील.

अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे शिक्षण संस्थांच्या माध्यमातून खुली करून देणारे डॉ. डी.वाय. पाटील. कोल्हापूर/प्रतिनिधी : आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर तरुणांना शिक्षणाची दारे आपल्या...

गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना

‘गोकुळ’ची गोबरसे समृद्धी कार्बन क्रेडीट बायोगॅस योजना बायोगॅसचा दुसरा टप्पा सुरु : नवीन ४००० बायोगॅस मंजूर या योजनेचा दूध उत्पादकांनी लाभ घेण्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे...

Recent Comments