विधान परिषद निवडणूक बिनविरोध, कोल्हापूर जिल्ह्यात पालकमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड
कोल्हापूर/प्रतिनिधी : अखेर विधान परिषदेची कोल्हापूरमधील निवडणूक बिनविरोध झाली अत्यंत चुरशीची होईल अशी वाटणारी ही निवडणूक अचानक बिनविरोध झाली आणि पक्षाकडून आदेश येताच माजी आमदार अमोल माळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष स्वामी कामाडी यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि अधिकृत घोषणा निवडीचे पत्र देऊन जिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी रेखावर यांनी जिल्हाधिकारी केली गेल्या दोन-तीन दिवसापासून निवडणूक बिनविरोध होणार याबाबत सुतोवाच मिळाले होते आज मात्र यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
भाजप-काँग्रेस-शिवसेना यांच्यात विधान परिषद निवडणुकीसाठी समझोता एक्स्प्रेस अखेर धावली असून दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यावर अखेर आज शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यावेळी प्रमुख उपस्थित होते. त्यानुसार कोल्हापूर विधान परिषदेतील भाजपचे उमेदवार अमल महाडिक व डमी उमेदवार शौमिका महाडिक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सूचना भाजपकडून करण्यात आली. परिणामी काँग्रेसचे उमेदवार व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडीचा मान मिळाला. या निवडीनंतर जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये आमदार व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दुपारी साडेतीन वाजता आमदार होण्याचा पत्राद्वारे अधिकृत मान घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेतली म्हणूनच माझी बिनविरोध निवड झाली असे सांगितले
तर यावेळी बोलताना ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निवडणुकीमध्ये मतदारांची नाराजी झालेली आहे त्यांनीही समजून घ्यावे आणि बिनविरोध निवडणूक होऊन कोल्हापूर जिल्ह्याला एक वेगळे वळण मिळाले आहे त्यामुळे पाटील आणि महाडिक यांनी आपले वाद मिटवावे अशी आशा व्यक्त केली तर ज्या उमेदवारांनी भाजप पक्षश्रेष्ठींच्या शब्दाला मान देऊन ज्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली त्यांचाही मी आभारी असल्याचे सांगितले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीविषयी बोलताना त्यांनी जिल्हा बँकेची निवडणुक १००% बिनविरोध होईल असा दावा मी करणार नसल्याचे सांगितले. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होताच पालकमंत्री सतेज पाटील व पाटील यांच्यावर प्रेम करणारा सर्व वर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाला होता कोल्हापूर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून या बिनविरोध निवडीचा आनंद जल्लोष साजरा केला गेला.