Friday, September 20, 2024
Home ताज्या "संघर्ष हीच माझी ओळख, जनतेच्या साथीने पुन्हा यशस्वी होणार"- राजेश क्षीरसागर यांच्या...

“संघर्ष हीच माझी ओळख, जनतेच्या साथीने पुन्हा यशस्वी होणार”- राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिनी शिवसैनिकांच्या उत्साहातून २०२४ विजयाचे संकेत

“संघर्ष हीच माझी ओळख, जनतेच्या साथीने पुन्हा यशस्वी होणार”- राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिनी शिवसैनिकांच्या उत्साहातून २०२४ विजयाचे संकेत

कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस म्हणजे शिवसैनिकांसह समर्थकांकडून जल्लोषाने साजरा करण्यात येतो. गेली दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय श्री.राजेश क्षीरसागर यांनी घेतला होता. परंतु, यावर्षी शिवसैनिकांच्या उत्साहाने आणि जल्लोषी वातावरणात श्री.राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस साजरा करीत “संघर्ष हीच माझी ओळख, जनतेच्या साथीने पुन्हा यशस्वी होणार” अशी गर्जनाच श्री.क्षीरसागर यांनी केली. शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिक, कार्यकर्ते आणि समर्थकांनी वेगवेगळ्या गटाने शुभेच्छा देण्याकरिता गर्दीचा उच्चांक करून जणू शक्तीप्रदर्शन केले. यातून शिवसैनिकांसह, शहरातील तालीम संस्था, मंडळांचे कार्यकर्ते यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत श्री.राजेश क्षीरसागर यांनाच पुन्हा आमदार करण्याचा विडा उचलला.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचा वाढदिवस आज विविध सामाजिक उपक्रमांनी आणि खासकरून शिवसैनिक व कार्यकर्त्यांच्या उत्सहात संपन्न झाला. सायंकाळी शिवालय, शिवसेना शहर कार्यालय शनिवार पेठ येथे क्षीरसागर कुटुंबीय, मान्यवर आणि शिवसैनिक, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत श्री.राजेश क्षीरसागर यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी प.म.देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या महिला भगिनींनी औक्षण ओवाळले. यानंतर भव्य आतषबाजी, वाद्यांच्या गजरात शिवसैनिक व कार्यकर्त्यांनी श्री.राजेश क्षीरसागर यांना शुभेच्छा दिल्या.दरम्यान दिवसभरात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब, पर्यावरण मंत्री नाम.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब, नगरविकास मंत्री नाम.श्री. एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री श्री.मनोहर जोशी, परिवहन मंत्री नाम.श्री.अनिल परब, कृषी मंत्री नाम.श्री.दादाजी भुसे, शिवसेना सचिव खासदार श्री.अनिल देसाई, शिवसेना सचिव खासदार श्री.विनायक राऊत, मा.परिवहन मंत्री आमदार श्री.दिवाकरजी रावते, विधिमंडळ उपनेत्या आम.डॉ.नीलमताई गोऱ्हे, शिवसेना संपर्कप्रमुख श्री.अरुणभाई दुधवडकर, आमदार राजन साळवी, आमदार अंबादास दानवे, आमदार शिरीष शिंदे, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार शहाजी पाटील, आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर आदी इतर प्रमुख मान्यवरांनी दुरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
राजेश क्षीरसागर यांचा २४ नोव्हेंबर या दिनी वाढदिवस. या वाढदिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, समर्थकांनी श्री.क्षीरसागर यांना शुभेच्छा देत २०२४ मधील विधानसभा निवडणूक ताकतीने लढविण्याचे संकेत दिले आहेत. कोल्हापुरातील नागरी प्रश्नासाठी क्षीरसागर यांनी सातत्याने रस्त्यावर उतरुन आंदोलने केली. सरकार दरबारी पाठपुरावा केला. एक लढवय्या कार्यकर्ता, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे. शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे साहेब यांचाही त्यांना आशिर्वाद लाभलेला. पुढे शिवसेनापक्षप्रमुख मुख्यमंत्री नाम.मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.राजेश क्षीरसागर यांची वाटचाल सुरू झाली. पद असो की नसो ते सातत्याने लोकांसाठी आंदोलने केली. कोल्हापुरातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीत त्यांचा पुढाकार ठरलेला. टोल विरोधी आंदोलन, व्यापाऱ्यांचे प्रश्न, पाणी प्रश्न अशा विविध समस्यांच्या सोडवणुकीला प्राधान्य दिले. कुशल संघटन, कार्यकर्त्यांची फौज आणि विकासकामांचा धडाका या बळावर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळेला प्रतिनिधीत्व केले. २००९ आणि २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत क्षीरसागर विजयी ठरले. या कालावधीत शहर विकासाच्या विविध प्रकल्पांना चालना दिली. हजारो रुग्णांना वैद्यकीय मदत लहान मुलांना वैद्यकीय उपचारासाठी अर्थसाहाय्य मिळवून दिले. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून, पक्षप्रमुख व मुख्यमंत्री नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्याची जणू तयारीच श्री.राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. श्री.राजेश क्षीरसागर यांच्या एकनिष्ठता आणि पक्ष संघटनेचे कार्य पाहून मुख्यमंत्री नाम.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांनी त्यांची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपदी (कॅबिनेट मंत्रीपद दर्जा) नियुक्ती केली. नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांनी शहरातील पायाभूत सुविधा, रंकाळा तलाव संवर्धन व सुशोभिकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहरातील विविध विकासकामासाठी निधी मंजूर करुन आणण्यात क्षीरसागर यांचा पुढाकार राहिला. यासह या राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष पदास खरी दिशा व ओळख देण्याचे काम करीत गेल्या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यांचे विभागवार दौरे करून ज्या त्या जिल्ह्यात आवश्यक्त त्या उपाययोजना, आरोग्य यंत्रणा सक्षम करणे, पर्यटनाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या. आगामी महापालिका आणि २०२४ मधील विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी श्री.राजेश क्षीरसागर प्रयत्नशील आहेत.
संघर्ष हीच माझी ओळख, इतिहास पराभवाची पण नोंद घेतो. फक्त संघर्षात दम पाहिजे’हा आशावाद जागवत शिवसैनिक व कार्यकर्त्यात स्फुल्लिंग चेतवित आहेत. जनतेच्या प्रश्नासाठी थेट रस्त्यावर उतरुन लढणारा नेता म्हणून क्षीरसागर यांची जनमानसात ओळख आहे.वाढदिनाचे औचित्य साधून २०२४ मधील विधानसभेचे मैदान पुन्हा जिंकण्याचा त्यांचा संकल्प दिसून आला.दरम्यान सकाळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांनी करवीरनिवासिनी आई अंबाबाई, श्री जोतीबा दर्शन घेतले. यानंतर शिवसेना राजारामपुरी विभागाच्या वतीने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते पांजरपोळ येथे गोमातेचे पूजन करून गाईना डाळ, गुळ, चारा वाटप करण्यात आले. यानंतर शिवसेना फेरीवाले सेनेच्या वतीने कोल्हापूर थाळी येथे गोरगरीब नागरिकांना भोजन वाटप करण्यात आले. तर युवा सेनेच्या वतीने श्री जोतीबा येथे अभिषेक अर्पण करून श्री.राजेश क्षीरसागर यांना उदंड आयुष्य लाभावे, असे साकडे घातले.
सायंकाळी शिवसेना शहर कार्यालय येथे युवा नेतेऋतुराज क्षीरसागर, शहरप्रमुख जयवंत हारुगले, मा.नगरसेवक नंदकुमार मोरे, मा.नगरसेवक रविकिरण इंगवले, मा.नगरसेवक किरण शिराळे, पुष्कराज क्षीरसागर, रमेश खाडे, तुकाराम साळोखे, धनाजी दळवी, किशोर घाटगे, रणजीत जाधव, महिला आघाडी शहरप्रमुख सौ.मंगलताई साळोखे, सौ.पूजा कामते, सौ.गौरी माळतकर, सौ.मंगलताई कुलकर्णी, सौ.शारदा भांदिगरे, सौ.पूजा पाटील यांच्यासह शिवसेना उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, शिवसैनिक, युवा सैनिक, शहरातील विविध तालीम संस्था, मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते, सामाजिक, राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे “यामिनी” प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे अकरावे "यामिनी" प्रदर्शन आजपासून सुरू २०.२१.२२ सप्टेंबर रोजी आयोजित कोल्हापूर/प्रतिनिधी : दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापुरच्या जनतेला वेध लागतात ते यामिनी...

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली

पर्यावरण पुरक गणेशोत्सवास सार्वजनिक मंडळांचा उस्फुर्त प्रतिसाद,पोलिस यंत्रणा राबली इराणी खणीमध्ये सार्वजनिक मंडळाच्या १०३५ व घरगुती व मंडळांच्या लहान ११०१ गणेश मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन कोल्हापूर/प्रतिनिधी :...

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न

श्री सिद्धिविनायक संस्थेची रौप्य महोत्सवी सभा संपन्न जयसिंगपूर/प्रतिनिधी : श्री.सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्थेची रौप्य महोत्सवी सभा सोसायटीच्या प्रांगणात १५ सप्टेंबर रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.सभेचे...

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा

स्वामी भक्तांचा शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा कोल्हापूर/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ भक्त कोल्हापूर शहर व जिल्हा या़ंचेवतीने ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांच्यावर...

Recent Comments