केवळ दोन मिनिट उशीर झाल्याने विद्यार्थ्यांना मुकावे लागले शिक्षक पात्रता परीक्षेस एकले नाही
प्रशासनानेही
कोल्हापूर/प्रतिनिधी : आज शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी)होती कोल्हापूर जिल्ह्यात मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता न आल्याने परीक्षेस बसता आले नाही कोल्हापूर मधील बऱ्याच परीक्षा केंद्रांवर आज ही परिस्थिती विद्यार्थ्यांवर ओढवली होती मात्र या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली नाही त्यामुळे विद्यार्थ्यांमधून आणि पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.संतप्त विद्यार्थी व पालकांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला मात्र तरीही प्रशासनाने ऐकून न घेतल्याने आज मात्र त्यांच्यावर परीक्षा न देण्याची परिस्थिती ओढवली या सर्व प्रकाराला जबाबदार कोण आहे याबाबत मात्र विचार करणे आवश्यक आहे
आधीच कोरोनामुळे विद्यार्थी संभ्रमावस्था होते त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या या परिस्थितीतून ते बाहेर पडत नाही तोपर्यंत त्यांची परीक्षा आज असतानाही त्यांना वेळेमध्ये परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही केवळ दोन मिनिटे उशीर झाल्याने त्यांना परीक्षा केंद्रावर आत मध्ये घेतले गेले नाही त्यातच गेल्या पंधरा दिवसापासून एसटी संप सुरू आहे त्यामुळेही परीक्षा केंद्रांवर वेळेस येता आले नाही असे म्हणावे लागेल आणि अन्य कारणही असतील मात्र प्रशासनाने याची दखल घेणे आवश्यक होते मात्र या विद्यार्थ्यांच्या बाबतीत हे घडले नाही त्यांना परीक्षेस मुकावे लागले आता याबाबत राज्य सरकारने या विद्यार्थ्यांच्या बाबतीत मार्ग काढणे आवश्यक आहे अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.