गुरु नानकजी यांचा शांतीचा संदेश घेऊन जगूया – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन – सांगली येथे गुरुनानक जयंती सोहळ्याला उपस्थिती
सांगली/प्रतिनिधी : गुरु नानकजी यानी संपूर्ण मानवजातीला शांतीचा संदेश दिला. त्यांनी शिकविलेल्या आदर्शांची जपणूक करूया, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या महान महात्म्यांनी दिलेले संदेश आचरणात आणणे हेच त्यांना अभिवादन आहे, असेही ते म्हणाले.सांगली येथे गुरु नानकजी यांच्या ५५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. सिंधी पुरुषार्थी पंचायत ट्रस्ट, सांगली यांच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते.यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक मयूर पाटील, कोल्हापूर महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, निकेश गिडवानी यांच्यासह पदाधिकारी व सिंधी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.