पेठ गावच्या हद्दीत रोपाडे जंगल घाटात गावठी हातभट्टीची दारू तयार करणारी आढळली दुसरी भट्टी
कोल्हापूर/प्रतिनिधी : भुदरगड पोलीस ठाणे हद्दीत भुदरगड किल्ल्याच्या मागे घनदाट जंगलात जकिन पेठ गावचे परिसरातील अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या हात भट्टीचा शोध घेतला असता दुपारी ०९. ४५ वाजता जकीन पेठ गावच्या हद्दीत रोपाडे जंगल घाटात गावठी हातभट्टीची दारू तयार करणारी दुसरी भट्टी मिळाली आहे. सदर भट्टी मध्ये २०० लिटर क्षमतेची सेंटॅक्स टाकी तसेच २०० लिटर क्षमतेचे १ प्लास्टिक ब्यारल अशा एकूण २ टाक्यांमध्ये ४०० लिटर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन किंमत ३००००/- रुपये मिळून आले तसेच शेजारीच जळावू लाकडे, ०४ प्लास्टिक घागरी, पाईप त्याचप्रमाणे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लागणारे इतर साहित्य असा एकूण ४०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदरची भट्टी कोणाचे मालकीची आहे याबाबत जकिण पेठ गावचे पोलीस पाटील यांच्याकडे चौकशी केली असता ती एकनाथ लक्ष्मण बावकर, वय अंदाजे ४५ वर्ष, रा. जकिंनपेठ, ता.भुदरगड याचे मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. सदरबाबत पंचनामा करून हंडे, कांडेनसेशन पाईप, नवसागर तसेच रसायनाचा नमुना घेऊन इतर सर्व वस्तू, कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. सदर प्रकरणी गु. र. क्र. ३४२/२१, भा द वी कलम ३२८, ३३६ तसेच दारूबंदी कायदा कलम ६५(क), (फ), (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे असे भुदरगड पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, यांनी सांगितले आहे.