कराड/प्रतिनिधी : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत विविध विकासकामांसाठी ४ कोटी २२ लाख ४४ हजार इतका निधी मंजूर झाला आहे, हा निधी मंजूर करण्यासाठी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रयत्न केला असून या निधीमधून जिंती, आगाशिवनगर, कार्वे, शिबेवाडी, पवारवाडी, तारूख, ओंड, येणपे, कासारशिरंबे, शिंदेवाडी, किरपे, गोंदी, कोडोली, आणे, येरवळे, घारेवाडी, आकाईचीवाडी, शेळकेवाडी, पाचवडेश्वर, रेठरे खुर्द, गोळेश्वर, सैदापूर, आंबवडे, चचेगाव, शेरे, तुळसण, सवादे, गोटेवाडी, भरेवाडी, शिंगणवाडी, पाचपुतेवाडी, येवती, घराळवाडी आदी गावांमध्ये मंजूर निधीतून विविध विकासकामे केली जाणार आहेत.
जखीणवाडी येथील जि.प. शाळेची खोली बांधणेसाठी रु. ८ लाख ९६ हजार, कासारशिरंबे जि.प. शाळेसाठी रु. ८ लाख ९६ हजार, कालवडे जि.प. शाळेसाठी रु. ८ लाख ९६ हजार, आकाईचीवाडी (जिंती) जि.प. शाळेसाठी रु. ३ लाख, आगाशिवनगर जि.प. शाळा दुरुस्तीसाठी रु. ३ लाख, कार्वे जि.प. शाळा दुरुस्तीसाठी रु. ३ लाख, शिबेवाडी (तारूख) साठवण बंधारा बांधणीसाठी रु. ९ लाख ६० हजार, पवारवाडी (तारूख) साठवण बंधारा बांधणीसाठी रु. ६ लाख ५६ हजार, ओंड साठवण बंधारा बांधणीसाठी रु. ११ लाख ३४ हजार, येणपे साठवण बंधारा बांधणी रु. ६ लाख ४ हजार, कासारशिरंबे साठवण बंधारा बांधणी रु. १२ लाख ८८ हजार, शिंदेवाडी (विंग) स्मशानभूमीजवळ साठवण बंधारा बांधणी १० लाख १४ हजार, किरपे ग्रामपंचायत कार्यालय समोरील संरक्षक भिंत बांधणे रु. ३ लाख, गोंदी येथे बंदिस्त गटर बांधणीसाठी रु. ४ लाख, कोडोली ग्रामसचिवालय बांधणीसाठी रु. ५ लाख, आणे येथे संरक्षक भिंतीसाठी रु. ३ लाख, येरवळे स्मशानभूमी सुधरणाकरिता रु. ४ लाख, घारेवाडी स्मशानभूमी सुधारणा रु. ४ लाख, तारूख अंतर्गत रस्ता रु. ४ लाख, आकाईचीवाडी अंतर्गत रस्ता रु. ४ लाख, शेळकेवाडी अंतर्गत रस्ता रु. ४ लाख, घारेवाडी येथील धुळेश्वर देवस्थान पाझर तलाव ते मंदिर रस्त्यासाठी रु. ८ लाख, पाचवडेश्वर मंदिराच्या संरक्षक भिंतीसाठी रु. ५ लाख, रेठरे खुर्द येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील संरक्षक भिंतीसाठी रु. ८ लाख, गोळेश्वर येथील अंतर्गत रस्त्यासाठी रु. ८ लाख, सैदापूर येथील अंतर्गत रस्त्यासाठी रु. ११ लाख, कार्वे येथील अंतर्गत गटरसह काँक्रिटीकरण साठी रु. ५ लाख, तारूख येथील ओढ्यावर साकव बांधण्यासाठी रु. ३५ लाख, अंबवडे येथील ओढ्यावर साकव बांधणे रु. ३५ लाख, कासारशिरंबे येथील ओढ्यावर साकव बांधणे रु. ३० लाख, चचेगाव-येरवळे-पोतले काळेपाणंद रस्त्यासाठी रु. १० लाख, ओंड ते मनू रस्त्यासाठी रु. १० लाख, शेरे ते वाल्मिकी पाणंद रस्त्यासाठी रु. १५ लाख, तुळसण सवादे रस्त्यासाठी रु. १५ लाख, कासारशिरंबे ते सटवाईचीवाडी ते कालवडे रस्त्यासाठी रु. १५ लाख, खुबी कृष्णा कॅनॉल ते कारखाना ते काळूबाई पाणंद रस्त्यासाठी रु. १० लाख, गोटेवाडी भरेवाडी जोडरस्त्यासाठी रु. १० लाख, शिंगणवाडी कोळे पाटीलमळा कराळवस्ती ते आणे जोडरस्त्यासाठी रु. १० लाख, तुळसण पाचपुतेवाडी रस्त्यासाठी रु. १५ लाख, थोरातमळा शेरे रस्त्यासाठी रु. १५ लाख, येवती घराळवाडी मस्करवाडी चव्हाणवाडी धामणी डाकेवाडी निवी रस्त्यासाठी रु. २५ लाख असा एकूण ४ कोटी २२ लाख ४४ हजार इतका भरघोस निधी माजी मुख्यामंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला आहे.