धोकादायक इमारतीतून सुरक्षित इमारतीत शाळा भरवून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्याची मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : धोकादायक इमारतीतून सुरक्षित इमारतीत शाळा भरवून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्याची मागणी ही आज कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने जयभारत शिक्षण संस्था,
रुईकर कॉलनी येथे निदर्शने करून संस्थाचालकांना निवेदन देण्यात आले. डॉ.श्रीधर सावंत विद्यामंदिर ही इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतची शाळा चालू असुन या शाळेमध्ये सर्वसामान्य गोरगरीब, मोलमजुरी करणाऱ्या बहुजन कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेले वर्षभर कोविड प्रादुर्भावामुळे शाळा चालू बंद अवस्थेतच आहेत. पण सध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करुन आरोग्याची अध्यापनांतर्गत शाळा चालू केल्या आहेत. पण आपली शाळा अद्याप
दक्षता घेऊन चालू केलेली नाही.
महापालिका शिक्षण विभाग, महापालिका बांधकाम विभागाने शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या तज्ञ समितीच्या अहवालानुसार आपल्या शाळेची इमारत शाळा भरविण्यास
अयोग्य असुन त्या ठिकाणी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक यांच्या जिवितास धोका पोहचविणारी धोकादायक आहे. त्यामुळे येथे शैक्षणिक कामकाज न करता अन्यत्र सुरक्षित इमारतीत शाळा भरवावी असे लेखी आदेश आपणास गेल्या सहा महिन्यापुर्वीच दिले असताना आपण त्यावर काहीच हालचाल करुन शाळा सुरु करण्यास पर्यायी व्यवस्था न केलेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून बाजूला जाण्याची शक्यता आहे. आमचे माहीतीप्रमाणे आपण आहे त्याच धोकादायक इमारतीत शालेय कामकाज करीत असल्याचे
दिसते. महापालिका बांधकाम विभाग शिक्षण विभाग व शासकीय तंत्रनिकेतनचा अहवाल व आदेश डावलून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी पालकांच्या जीवाशी खेळून त्यांचे शैक्षणिक
नुकसान करीत आहात ही बाब अतिशय गंभीर व माणुसकीला सोडून आहे. आम्ही आपणास या निवेदनाव्दारे विनंती करतो की त्वरीत सुरक्षित अशा इमारतीत
शालेय कामकाज चालू करुन विद्यार्थ्यांचे भवितव्य उज्वल करण्यास सहकार्य अन्यथा आम्हाला आपल्या विरोधी लोकशाहीच्या सनदशीर मार्गाने आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या
सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल. त्याप्रसंगी होणाऱ्या बऱ्यावाईट परिणामास आपण व आपली संस्था सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन कृती समितीने केले आहे.